Thursday, October 3, 2024
Homeराजकीय घडामोडीअडीच वर्ष बसले घरी, माहिती घेतात वरी वरी, पण आमचं शासन जातयं...

अडीच वर्ष बसले घरी, माहिती घेतात वरी वरी, पण आमचं शासन जातयं घरोघरी; एकनाथ शिंदेंचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

शासन आपल्या दारी (Shasan Apalya Dari) हा कार्यक्रम पाहून अनेक लोकांना पोटदुखी होत आहे. यावर उपाय म्हणून आम्ही लवकरच ‘डॉक्टर आपल्या दारी’ सुरू करणार आहोत. हा आमचा पब्लिसिटी करण्याचा प्रयत्न नाही. हे बसले अडीच वर्ष घरी, माहिती घेतात वरी वरी, पण आमच शासन जातयं घरोघरी, अशा शायराना अंदाजात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी पाचोरा (Pachora) शहरात शासन आपल्या दारी कार्यक्रमात उपस्थिती लावल्यानंतर जनतेला संबोधित केले. जळगावमध्ये (Jalgaon) उद्धव ठाकरे यांनी शासन आपल्या दारी कार्यक्रमावर टीका केली होती. या टीकेला एकनाथ शिंदे यांनी शायराना अंदाजात प्रत्युत्तर दिले आहे. शिंदे म्हणाले की, ‘हे बसले अडीच वर्ष घरी, माहिती घेतात वरी वरी, पण आमच शासन जातयं घरोघरी. लाभार्थ्यांना नेतंय स्टेजवरी, सामान्यांसाठी अहोरात्री काम करी, म्हणून लाखोंची गर्दी होते, कार्यक्रमावरी, ‘ अशा अंदाजात उद्धव ठाकरेंना (Udhhav Thackeray) उत्तर दिले आहे. शिवाय लोक उगाच शासना आपल्या दारी कार्यक्रमात येत नाहीत. ते घरी बसले आम्ही लोकांच्या दारी जात आहोत, आम्ही काम करतोय, त्याच गर्दी हे उत्तर असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, अजित दादा (Ajit Pawar) देखील विकासाला पाठिंबा देण्यासाठी राज्य सरकारसोबत आले. देशाला पुढे न्यायचं असेल तर नरेंद्र मोदी यांच्याशिवाय देशाला पर्याय नाही. राज्याला नरेंद्र मोदी यांचा नेहमी पाठिंबा राहतो. हे सरकार ‘शासन आपल्या दारी’ या माध्यमातून गतिमान झाले. अडीच वर्षे मागचे सरकार थांबले होते. आपण अनेक प्रकल्प सुरू केले. आपण महिलांना 50 टक्के, आणि ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची योजना दिली. पीक विमा योजनेत एक रुपया भरून बाकी सर्व पैसे सरकार भरणार. शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मला अभिमान आहे आणि अडचणी यांची देखील जाण आहे. हे सरकार सर्व सामान्य लोकांना न्याय देणारे आहे. काही ठिकाणी पाऊस कमी पडलाय, ही वस्तूस्थिती असल्याचे शिंदे म्हणाले.

भेटीमुळे पोटदुखी होत आहे….
तसेच दिल्लीत परिषद (G20 Conference) सुरू आहे. जगभरातले 20 देशांचे प्रमुख तिथे आले. त्यांचे बॉडिंग मोदी यांच्यासोबत पाहिली का तुम्ही? आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. तिथल्या ठरावाला मान्यता मिळाली. खऱ्या अर्थाने देश महासत्ता होत आहे. मग का पोटदुखी होत आहे? सरकार गेल्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. मी ब्रिटनचे पंतप्रधान यांना भेटलो, तर टीका सुरू झाली. मी काय बोललो, कसं बोललो, यावर चर्चा सुरू झाली. “आम्हाला सगळं माहिती आहे. आम्हाला बोलण्याची वेळ येऊ देऊ नका, नाहीतर पाटणकर काढा घेण्याची वेळ आपल्यावर येईल. मला टीका करायची नाही. मी कुणाला भेटलो तर यांना जळते. यांनी बोलतांनी तारतम्य ठेवावे”, असा इशारा एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना, त्यांनी तुमचा एकही शब्द खाली पडू दिला नाही. असा कानमंत्रही एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना अप्रत्यक्ष दिला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -