पर्यावरण पूरक तसेच आनंदी आणि उत्साही वातावरणात घरगुती गणेश मूर्ती विसर्जनासाठी शहरातील विविध ७२ ठिकाणी कृत्रिम गणेश विसर्जन कुंड ठेवणे तसेच शहरातील शहापूर खण येथे गणेश मूर्ती विसर्जन करणेकरिता आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी महानगर पालिकेच्या वतीने सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
शहरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करणेत येतो. या अनुषंगाने महानगरपालिका स्तरावरुन विविध उपाययोजना राबविण्यात येत असतात. यासाठी आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांनी गुरुवारी उपायुक्त तैमूर मुलाणी आणि सोमनाथ आढाव यांच्या प्रमुख उपस्थितीत या विषयाशी संबंधित सर्व विभाग प्रमुख यांच्या समवेत बैठकीचे आयोजन केले होते.
या बैठकीमध्ये विभाग प्रमुख यांनी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने केलेल्या पुर्वतयारी बाबतची माहिती दिली. या बैठकीसाठी सहा. आयुक्त केतन गुजर, मुख्य वित्त व लेखा अधिकारी विकास खोळपे. कामगार अधिकारी विजय राजापुरे, शहर अभियंता महेंद्र क्षिरसागर, कार्यकारी अभियंता संजय बागडे, जल अभियंता सुभाष देशपांडे, आरोग्य अधिकारी डॉ. सुनिलदत्त संगेवार, विविध अभियंता संदीप जाधव, अग्निशमन अधिकारी सौरभ साळुंखे, सहा. आयुक्त मिळकत सचिन पाटील, खरेदी पर्यवेक्षक शितल पाटील, वाहन अधीक्षक राजेंद्र मिरगे, उद्यान पर्यवेक्षक सुनिल बेलेकर, माहिती व जनसंपर्क अधिकारी नितिन बनगे, सहा. क्रीडा अधिकारी संजय कांबळे, याचेसह महानगरपालिकेचे विविध विभाग प्रमुख उपस्थित होते.
पर्यावरण पुरक गणेशोत्सवासाठी महानगरपालिका मदत करणार ; प्रशासक ओमप्रकाश दिवटे
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -