राज्यातील सर्वच शेतकऱ्यांना यंदाच्या गणेशोत्सवापूर्वीच आनंदाची बातमी मिळाली आहे कारण गेली अनेक महिन्यांपासून दुष्काळ मुळे संकटात असलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी राज्यातील सर्वच शेतकऱ्यांच्या खात्यावर गणेशोत्सवात ४००० रु.येणार असल्याची माहिती मिळत आहे.हे ४००० रु म्हणजे पीएम किसान सन्मान योजनेचा १५ वा हफ्ता २००० रु.आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा १ ला हफ्ता २००० रु.असे महाराष्ट्र राज्यातील सर्वच पात्र शेतकऱ्यांना ४००० रु.दिले जाणार आहेत याबाबत आता यादी देखील प्रसिध्द करण्यात आली आहे सविस्तर माहिती पाहू.नमो शेतकरी सन्मान योजना २०२३ या योजने अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील ८५ लाख ६६ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर पहिला हफ्ता जमा केला जाणार आहे.शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट निधी जमा करण्यासाठी आता राज्य शासनाच्या माध्यमातून एक मध्यवर्ती बँक खाते काढण्यास देखील परवानगी मिळाली आहे.या खात्याच्या अंतर्गत निधी हा आता शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट वर्ग करण्यात येणार आहे.यासाठी शेतकऱ्यांच्या बँक खात्याची केवायसी केलेली असणे बंधनकारक आहे.
नमो शेतकरी योजनेसोबत पीएम किसान सन्मान योजनेचा देखील आता १५ वा हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे मिळालेल्या माहिती नुसार या दोन्ही योजनेचा आता एकत्रित हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे.नमो शेतकरी योजना अंतिम टप्प्यात आहे आणि पीएम किसान योजनेसाठी देखील आता १५ वा हफ्ता देण्यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.