राज्यातील सातही औष्णिक विद्युत केंद्रातील वीजनिर्मिती सलग तिस-या दिवशी प्रभावित झाली आहे. त्यामुळे, राज्यातील वीज संकट वाढण्याची शक्यता आहे. ऐन गणेशोत्सवात राज्यावर भारनियमनाची टांगती तलवार आहे. सध्यातरी राज्यातील सातही औष्णिक विद्युत केंद्रांतून क्षमतेच्या ५० टक्केच वीजनिर्मिती केली जाणार आहे. वास्तविक मुसळधार पावसाने कोळसा ओला झाला आहे. तसेच दुरुस्तीच्या कामामुळे सातही केंद्रांतील वीजनिर्मिती प्रभावित झाली आहे. त्याचाच हा परिणाम दिसून येऊ शकतो.
राज्याची ९५४० मेगावॅटची क्षमता असताना सध्या फक्त ४७३२ मेगावॅट वीजनिर्मिती या औष्णिक विद्युत केंद्रातून केली जात आहे. त्यामुळे आधीच तुटवडा असताना आता त्यावर आणखी परिणाम झाला आहे. महाराष्ट्रात एकूण सात औष्णिक विद्युत केंद्र आहेत. या सात केंद्रांवरून राज्यासाठी वीजनिर्मिती केली जाते. परंतु, आज सलग तिस-या दिवशी या केंद्रांवरील वीजनिर्मिती प्रभावित झाली आहे. याचा परिणाम वीज पुरवठ्यावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यासमोरील वीज संकट आणखी वाढण्याची शक्यता आहे.
सध्या क्षमतेच्या ५० टक्केच वीजनिर्मिती सुरू
महाराष्ट्रातील वीजनिर्मितीची क्षमता पाहता, त्याच्या केवळ ५० टक्केच वीजनिर्मिती सध्या सुरू आहे. राज्यात सततचा पाऊस, त्यामुळे ओला झालेला कोळसा आणि आधीच सुरू असलेली दुरुस्तीची कामे ही यामागची कारणे आहेत. त्यामुळे सातही वीजनिर्मिती केंद्रांच्या क्षमतेच्या केवळ ५० टक्केच वीजनिर्मिती सध्या सुरू आहे.