आकर्षक लाईट इफेक्ट ढोल-ताशांच्या कडकडाट व डॉल्बीच्या दणदणाटात कार्यकर्त्यांचा ओसंडून वाहणारा उत्साह, गणरायाचा अखंड जयघोष आणि भव्यदिव्य चित्ताकर्षक गणेश मूर्ती व आकर्षक आरास अशा विविधरंगी आकर्षक भावपूर्ण वातावरणात दहा दिवस विराजमान श्री गणरायाला वस्त्रनगरीत अखेरचा निरोप देण्यात आला.
कोणताही अनुचित प्रकार न सायंकाळनंतर गर्दीचा महापूर शहर परिसरातील विविध मंडळांनी आपल्या भव्य दिव्य मूर्त्यांची मिरवणूक सायंकाळनंतर काढली होती. मिरवणुकीत अनेक मंडळांची आकर्षक विद्युत रोषणाई केली होती. त्यामुळे मिरवणुक पाहण्यासाठी मार्गावर अलोट गर्दी झाली होती.
शांततापूर्ण तब्बल २६ तास चाललेल्या मिरवणूकीत वरुणराजानेही आपली हलकीशी हजेरी लावली. मिरवणूकीत महिला व युवतींचा मोठ्या संख्येने सहभाग होता. काही मंडळांनी त्यासाठी विशिष्ठ असा ड्रेसकोड केल्याने त्या मिरवणूका सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या. मिरवणूक पाहण्यासाठी मुख्य रस्त्यावर रात्री उशीरापर्यंत अलोट गर्दी लोटली होती. शुक्रवारी सकाळी ११.४० वाजता धार ग्रुप व पोलिस बॉईजच्या श्री मूर्तीचे विसर्जन होऊन मिरवणूकीची सांगता झाली.
अखेरच्या दिवशी महापालिका प्रशासनाने तयार केलेल्या लेल्या कृत्रिम जलकुंड, जलाशयासह शहापूर खण येथे ३५७ गणेशमूतीचे विसर्जन करण्यात आले. तर उर्वरीत गणेशमूर्तीचे पंचगंगेत विसर्जन करण्यात आले. शहर वाहतूक नियंत्रण शाखेपासून परंपरेनुसार मानाच्या श्री बिरदेव वाचनालय मंडळाच्या श्री पालखीचे मान्यवरांच्या हस्ते पुजन करून शिवतीर्थ येथून इचलकरंजीतील श्री विसर्जन मिरवणूकीचा प्रारंभ करण्यात आला. आमदार प्रकाश आवाडे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरिक्षक दिलीप भुजबळ – पाटील, पोलिस अधिक्षक महेंद्र पंडीत, अप्पर पोलिस अधिक्षक निकेश खाटमोडे-पाटील, महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे, पोलीस उपअधिक्षक समीरसिंह साळवे, प्रांताधिकारी सौ. मोसमी चौगुले, मदन कारंडे, माजी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, शिवसेना जिल्हाप्रमुख रविंद्र माने, पुंडलिकभाऊ जाधव आदी मान्यवरांच्या हस्ते श्री गणेशाचे पूजन करण्यात आले.
यावेळी इचलकरंजी पोलिस दलाच्या श्रींचे पुजन करण्यात आले. यावेळी पोलिसांनी सुध्दा गाण्यावर ठेका धरत नृत्याचा आनंद लुटला. तर महिला होमगार्डनी झिम्मा फुगडीचा फेर धरत मिरवणुकीत सहभाग घेतला. यावेळी पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार, सत्यवान हाके, प्रविण खामकर, शहर वाहतूक शाखेचे सपोनि राजीव पाटील, अप्पर तहसिलदार मनोज ऐतवडे, प्रकाश दत्तवाडे, अनिल डाळ्या, विठ्ठल चोपडे, सयाजी चव्हाण, महादेव गौड आदी मान्यवर उपस्थित होते.
कॉ. के. एल. मलाबादे चौक ते नदीवेस नाका या मार्गावर इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटी, शिवसेना, मारवाड़ी युवा मंच, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, दै. राष्ट्रगीत, श्री साईप्रसाद ग्रुप, क्रेडाई व बिल्डर्स असोशिएशमा भारतीय जनता पार्टी व शिवसेना (शिंदे गट), अखिल भारतीय होलार समाज, माऊली फौंडेशन, हिंदु एकता, राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार गट) इचलकरंजी महापालिका व महिला दक्षता कमिटी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवगर्जना सेवाभावी संस्था, सतेज फायटर, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (शरद पवार गट), इचलकरंजी फेस्टिबल व जय शिवराय मंडळ असे विविध स्वागत कक्ष उभारण्यात आले होते.
या व्यासपीठाच्या माध्यमांतून विसर्जन मिरवणूकीतील सहभागी सार्वजनिक गणेश मंडळांना मानाची पान-सुपारी, श्रीफळ देऊन स्वागत करण्यात येत होते. तसेच विविध सामाजिक संघटनांच्या वतीने भक्तांसाठी पिण्याचा पाण्याचा स्टॉल लावण्यात आला होता. प्रत्येक स्वागत कमानीला खा. धैर्यशिल माने यांनी भेट दिली. त्याप्रसंगी दिव्य अशा श्री मूर्ती रांगेत होत्या. कोणताही किरकोळ स्वरुपातही कलानगर गणेशोत्सव मंडळातर्फे प्रत्येक वर्षी विविध धार्मिक उपक्रम साजरे होत असतात. यावर्षी श्री महागणपतीची नित्य शास्त्रशुद्ध पुजा, शहाळ महोत्सव, अष्ठ फलाहार, महाभोग, सहस्र दिपोत्सव, पुष्प महोत्सव अशा अनेक धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आलेले होते. या उपक्रमांसोबत श्री महागणपतीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांचा एकच जनसागर उसळला होता. दररोजच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी होती, त्याचबरोबर नवव्या दिवशी विक्रमी गर्दीत दिड लाख भाविकांनी दर्शनासाठी उपस्थित राहुन एक विक्रम केला आहे. पुढच्या वर्षी होणाऱ्या गर्दीचे नेटके नियोजन करण्याचे आश्वासन देत कलानगर गणेशोत्सव मंडळातर्फे भाविकांच्या उदंड प्रतिसादाबद्दल आभार मानण्यात आले आहे.जिल्हाध्यक्ष रविंद्र माने यांचेसह पदाधिकारी उपस्थित होते.
सायंकाळनंतर अनेक मंडळांनी आपल्या श्री मूर्ती विसर्जन मिरवणूकीत सहभाग घेण्यास सुरुवात केली. रात्री उशीरापर्यंत महात्मा गांधी पुतळा ते शिवतीर्थ या मार्गावर अनेक भव्य आणि अनुचित प्रकार न घडता वस्त्रनगरीतील श्री विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडली. रात्री बारानंतर पोलिसांनी वाद्य बंद केले. यामुळे मंगळवार पेठ युवा मंचच्या कार्यकत्यांनी मलाबादे चौकात ठिय्या मारला. तब्बल दोन तासाच्या चर्चेनंतरही ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे मागे मोठ्या प्रमाणात मिरवणुक रेंगाळली होती. शेवटी राष्ट्रवादीचे नेते मदन कारंडे यांनी मध्यस्थी करीत कार्यकर्त्यांना शांत केल्यानंतर मिरवणुक मार्गस्थ झाली. रात्री
महिलांचा लक्षणिय सहभाग विविध सार्वजनिक गणेश | मंडळाच्या मिरवणुकीमध्ये महिलांचा तसेच युवतींची लक्षणिय सहभाग होता. त्यामध्ये महिला, युवतींनी ड्रेस कोड केल्याचे दिसून येत होते. त्यामुळे संबंधित मंडळाची मिरवणुक लक्षवेधी ठरताना दिसत होती.उशिरापर्यंत मिरवणुक सुरू होती. मिरवणुक पहाण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
कडक पोलिस बंदोबस्त गेल्या दहा दिवसांपासून गणेशोत्सव आणि ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर अखंड रात्रदिवस बंदोबस्तात तैनात असलेल्या पोलिस बांधवांनी विसर्जनाच्या दिवशीही अखेरच्या श्री मूर्तीचे विसर्जन होईपर्यंत पोलिस अधिकारी, सर्व कर्मचारी, गृहरक्षक दलाचे जवान, स्ट्रायकिंग फोर्स आपल्या सेवेत खंड पडू दिला नाही. . त्यामुळे कोठेही | अनुचित प्रकार घडला नाही.
आमदार प्रकाश आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली इचलकरंजी फेस्टिवलच्या माध्यमातून राजवाडा चौक येथे विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी येणान्या गणेश भक्तांसाठी मोफत अल्पोपहार वाटप करण्यात आला. या उपक्रमाचा सुमारे ५० हजार गणेशभक्तांनी लाभ घेतला. यंदा गणेशमूर्तीच्या उंचीवरील बंधने हटविण्यात आल्याने अनेक मंडळांनी भव्य आणि दिव्य अशा गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली होती. पाच फुटापासून ते सुमारे २८ फुटापर्यंत गणेशमूर्ती असल्याने त्या नेताना विसर्जन मार्गावर होणाऱ्या विद्युत तारांचा अडथळा होऊ नये अथवा कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी महावितरणचे सर्व कर्मचारी अखंडीतपणे कार्यरत होते.ट्रॅक्टरच्या बानेटवर नाचण्याचा प्रकार नाचण्याचा प्रकार
मिरवणुकीमध्ये अनेक मंडळांनी डॉल्बी लावला होता. त्याचबरोबर लेसर शो केला होता. तेव्हा अनेक उत्साही कार्यकर्ते ट्रॅक्टरच्या बॉनेटवर उभे राहून तर काही कार्यकर्ते लेसर शो साठी ट्रॉलीत उभारलेल्या स्ट्रक्चरवर बसल्याचे दिसत होते. असा प्रकार भविष्यात थांबविण्याची गरज आहे.