Sunday, August 3, 2025
Homeब्रेकिंगझोमॅटोचे डिलीव्हरी बॉय आजपासून संपावर, संपाला शिंदे गटाचा पाठिंबा

झोमॅटोचे डिलीव्हरी बॉय आजपासून संपावर, संपाला शिंदे गटाचा पाठिंबा

ऑनलाईन खाद्यपदार्थ पुरवणारी फुड कंपनी (Online Food App) झोमॅटोची (Zomato) मुंबईतील (Mumbai News) सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. विविध मागण्यांसाठी झोमॅटोचे डिलिव्हरी बॉय (Zomato Delivery Boy) आजपासून संपावर असणार आहेत. शिंदे गट (Shiv Sena : Shinde Group), प्रणित राष्ट्रीय कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वात सर्व डिलिव्हरी बॉय हा लढा लढणार आहेत. दरम्यान, मुंबईतील झोमॅटो डिलिव्हरी बॉईजनी पुकारलेल्या संपामुळे ऑनलाईन फूड ऑर्डर करणाऱ्या मुंबईरांचे हाल होण्याची शक्यता आहे.

 

झोमॅटो डिलिव्हरी बॉईजच्या मागण्या काय?

सर्व डिलिव्हरी बॉईजला समान ऑर्डर मिळाव्यात आणि पैसे वाढवून मिळावेत

पीक अप 3 किमी आणि ड्रॉप 7 किमी असावा

जुन्या मात्र कमी केलेल्या मुलांना पुन्हा कामावर घ्यावं

रायडरसोबत त्यांच्या कुटुंबियांनाही इन्शुरन्स मिळावा

इंसेंटिव्ह सर्वांना समान मिळावा आणि इतर मागण्या

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -