Sunday, August 3, 2025
Homeइचलकरंजीइचलकरंजीस पाणी देण्याची जबाबदारी शासनाची मुख्यमंत्र्यांनी खास. मानेंना दिली ग्वाही!

इचलकरंजीस पाणी देण्याची जबाबदारी शासनाची मुख्यमंत्र्यांनी खास. मानेंना दिली ग्वाही!

इचलकरंजी शहराला शुध्द पाणी देण्याबाबत राज्य शासन सरकार सकारात्मक आहे. आणि राज्य शासन आपली जबाबदारी पूर्ण करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार धैर्यशील माने यांना दिली असल्याची माहिती दूधगंगा अंमलबजावणी कृती समितीचे निमंत्रक विठ्ठल चोपडे यांनी दिली.

पाणी पुरवठा योजना मंजूरी केलेली आहे. परंतु कागल तालुक्यासह दुधगंगा नदीकाठावरील गावातून या योजनेला विरोध केला जात आहे. इचलकरंजीसाठी मंजूर सुळकुड योजनेबाबत वाद निर्माण झाल्याने त्याबाबत चर्चा करण्यासाठी ११ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक आयोजित केली होती. पण ती बैठक होऊ शकली नाही. त्यामुळे रद्द झालेली ही बैठक लवकरात लवकर घ्यावी यासाठी खास. धैर्यशील माने व दूधगंगा अंमलबजावणी कृती समितीचे निमंत्रक विठ्ठल चोपडे यांनी बुधवारी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी दूधगंगा धरणातील पिण्याच्या पाण्याचा राखीव साठ्यामधून इचलकरंजी शहरासाठी पाणी योजना मंजूर करण्यात आली आहे. तथापि धरणात असणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या साठा उपलब्धतेबाबत काही मंडळींनी शंका उपस्थित केली असल्याने त्याचे निरसन करण्यासाठी शासनाने प्रशासनाकडून अहवाल मागवून घेतला असून तो शासनास प्राप्त झाला आहे. त्यानुसार प्रथम जलसंपदा मंत्री व अधिकारी उपस्थितीमध्ये बैठक घेऊन त्यामध्ये पालकमंत्री व इतर सर्व संबंधितांना बोलावून त्यांच्या शंकांचे निरसन करून समन्वयातून मार्ग काढण्यात येईल. याबाबत शासनाकडे प्राप्त अहवालानुसार आढावा घेऊन बैठक  लावणेबाबत जलसंपदा मंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना सत्वर कळवण्यात येईल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -