Tuesday, July 29, 2025
Homeब्रेकिंगशिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी कधी? यावेळची सर्वात मोठी अपडेट समोर

शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी कधी? यावेळची सर्वात मोठी अपडेट समोर

ताजी बातमी ऑनलाईन टीम

शिवसेना पक्ष आणि चिन्ह संदर्भातची सुनावणी पुन्हा लांबणीवर गेली आहे. ही सुनावणी 31 ॲाक्टोबरला होणार होती. दरम्यान निवडणूक रोखे (इलेक्ट्रोल बॉंड) संदर्भात सुनावणी असल्यानं पक्ष चिन्हाची सुनावणी पुढे ढकलल्याचे वृत्त समोर आले आहे.

निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला शिवसेना पक्ष आणि चिन्ह दिले होते. याविरोधात ठाकरे गटाने न्यायालयात धाव घेतली होती. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हं यावर काय निर्णय होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आहे. संपूण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण निवडणुक आयोगासमोर सुनावणी झाली. शिवसेना पक्षावर दावा करण्यासह शिवसेनेचे चिन्ह असलेल्या धनुष्यबाण चिन्ह मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात जोरदार रस्सीखेच पहायला मिळाली . ठाकरे आणि शिंदे गटाचा युक्तीवाद संपला आहे.

शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने गोठवले आहे. मुंबईतील अंधेरी-पूर्व निवडणुकीच्या निमित्ताना निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला. त्याचवेळी उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोन्ही गटांना अंधेरी-पूर्व निवडणुकीत हे चिन्ह वापरता येणार नाही, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं. या निर्णयाला शिवसेना उद्धव ठाकरे गटाने दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -