Friday, May 9, 2025
Homeतंत्रज्ञानरेडमी-रियलमीला टक्कर देण्यासाठी Samsung चा नवा डाव; Galaxy A05s ची भारतीय बाजारात...

रेडमी-रियलमीला टक्कर देण्यासाठी Samsung चा नवा डाव; Galaxy A05s ची भारतीय बाजारात एंट्री


भारतात लाँच झाला आहे, हा हँडसेट कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर लिस्ट झाला आहे. ह्या प्रोडक्ट पेजवरून फोनचे फोटोज, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. त्यानुसार फोनयामध्ये ६जीबी रॅम, ५०००एमएएचची बॅटरी आणि ५० मेगापिक्सलचा कॅमेरा मिळेल. चला जाणून घेऊया गॅलेक्सी ए०५एसची संपूर्ण माहिती.

सॅमसंग गॅलेक्सी ए०५एस स्मार्टफोनमध्ये ६.७ इंचाचा मोठा फुलएचडी+ डिस्प्ले मिळेल. हा एलसीडी पॅनल १०८० x २४०० पिक्सल रिजोल्यूशन, ९० हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि १६मिलियन कलर डेप्थला सपोर्ट करतो. फोनची जाडी ८.८एमएम तर वजन १९४ग्राम आहे.

Samsung Galaxy A05s अँड्रॉइड १३ वर आधारित वनयुआयवर चालतो. फोन २ ओएस अपग्रेड आणि ४ वर्षांच्या सिक्योरिटी अपडेटसह येतो. प्रोसेसिंगसाठी क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ६८० प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. जोडीला ६जीबी रॅम आणि १२८जीबी इंटरनल स्टोरेज मिळते. फोनमधील रॅम प्लस फीचरच्या मदतीनं १२जीबी पर्यंत रॅम आणि मायक्रोएसडी कार्डच्या मदतीनं १टीबी पर्यंत स्टोरेज वाढवता येईल.

फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात ५० मेगापिक्सलचा वाइड अँगल कॅमेरा, २ मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि २ मेगापिक्सल डेप्थ सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी १३ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो.
हा फोन डॉल्बी अ‍ॅटमॉस सपोर्टसह बाजारात आला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी ह्यात टाइप सी पोर्ट, ३.५ मिमी हेडफोन जॅक, ब्लूटूथ ५.१ आणि वाय-फाय असे बेसिक फिचर मिळतात. सिक्योरिटीसाठी साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर तसेच फेस अनलॉक फीचरही मिळतं. पावर बॅकअपसाठी सॅमसंग गॅलेक्सी ए०५ स्मार्टफोनमध्ये ५,०००एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. ही मोठी बॅटरी वेगानं चार्ज करण्यासाठी २५वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी मिळते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -