Sunday, December 22, 2024
Homeदेश विदेशIsrael-Hamas War | इस्रायलविरोधात मुस्लीम देशांचा एल्गार, पाहा काय घेतला निर्णय

Israel-Hamas War | इस्रायलविरोधात मुस्लीम देशांचा एल्गार, पाहा काय घेतला निर्णय

ताजी बातमी ऑनलाईन टीम

पॅलेस्टाईन अतिरेकी संघटना हमास आणि इस्रायलमध्ये युद्ध सुरु असून आता जगातले मु्स्लीस देश एकटवले आहेत. मुस्लीम देशांची संघटना OIC ओआयसीच्या बैठकीत इराणने सर्व सदस्य देशांना इस्रायलवर संपूर्ण प्रतिबंध लावण्याची मागणी केली आहे. इराणने सदस्य देशांना इस्रायलबरोबरचे तेलासह सर्व व्यापारी संबंध तोडण्याची मागणी केली आहे. तसेच ज्या देशांचे इस्रायलशी राजनैति संबंध आहेत, त्यांनी इस्रायली राजदूतांची हकालपट्टी करावी असे म्हटले आहे.

मंगळवारी गाझाच्या एका हॉस्पिटलवर झालेल्या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात पॅलेस्टाईन नागरिक ठार झाले आहेत. यावर चर्चा करण्यासाठी बुधवारी सौदी अरबच्या जेद्दा शहरात ओआयसीची एक इमर्जन्सी बैठक बोलावण्यात आली होती. याबैठकीत इराणचे परराष्ट्रमंत्री हुसेन अमीर अब्दुल्लाहियान यांनी इस्रायलवर सर्व मुस्लीम देशांनी तेलासह सर्व व्यापारी संबंध तोडून टाकावेत अशी मागणी इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केली आहे.

ज्या मु्स्लीम देशाचे इस्रायलशी राजकीय संबंध आहेत त्या देशांनी तत्काळ स्वरुपात आपल्या येथील इस्रायली राजदूतांना बडतर्फ करावे असेही आवाहन इराणने मुस्लीम देशांना केले आहे. इस्रायलच्या वतीने गाझा होत असलेल्या युद्धाबाबत गुन्हे दाखल करण्यासाठी मुस्लीम देशांनी वकीलांची टीमही देखील स्थापन करावी असे इराणचे परराष्ट्रमंत्री हुसैन अमीर अब्दुल्लाहियान यांनी म्हटले आहे.

गाझा रुग्णालय स्फोटात 500 हून अधिक ठार
मंगळवारी रात्री गाझाच्या अल अहली हॉस्पिटलमध्ये झालेल्या रॉकेट हल्ल्यात 500 हून अधिक लोक ठार झाले आहेत. या हल्ल्याबद्दल इस्रायलवर आरोप होत आहे. इस्रायलने मात्र यामागे आपला हात नसल्याचे म्हटले आहे. हा हल्ला हमासच्या रॉकेटनेच झाल्याचे इस्रायलने म्हटले आहे. दिशा भरकटल्याने ते रुग्णालयावर पडल्याचे इस्रायलने म्हटले आहे. युद्धातून जखमी झालेल्यांनी तेथे आसरा घेतला आणि त्यावरच हल्ला झाल्याचे दु:खद घटना घडली आहे. ओआयसी या 57 मुस्लीम देशांच्या संघटनेने रुग्णालयावरील हल्ल्याचा कठोर शब्दात निषेध केला आहे. पॅलेस्टीनींवर होत असलेल्या अत्याचाराला आंतरराष्ट्रीय मानवी अधिकाराचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे.

इराणवर होतोय आरोप
इस्रायलने पॅलेस्टाईनवर केलेल्या हल्ल्यामुळे इराण आणि तुर्की हे दोन देश भडकले आहेत. हे दोन्ही देश पॅलेस्टाईनची वकीली करीत आहेत. गाझाचे युद्ध रोखले नाही तर युद्ध अनेक मोर्चावर सुरु होईल अशी धमकी या दोन देशांनी इस्रायला दिली आहे. 7 ऑक्टोबरच्या इस्रायलवरील हमासच्या हल्ल्याला इराणची फूस असल्याचा आरोप होत आहे. इराणने मात्र सर्व आरोप फेटाळले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -