ताजी बातमी ऑनलाईन टीम
सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्यावतीने मागील
२० वर्षांपासून शहरात सुरु करण्यात आलेला शाही दसरा महोत्सव यंदा मोठ्या उत्साहात आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात येणार आहे. शाही मिरवणूक आणि सिमोल्लंघन सोहळा आदी कार्यक्रम मंगळवार २४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी श्रीमंत ना. बा. घोरपडे चौक (दसरा चौक) येथे होतील, अशी माहिती दसरा महोत्सव समितीचे संस्थापक सुरेशदादा पाटील यांनी दिली.
यावेळी इचलकरंजीचे जहागिरदार श्रीमंत नारायणराव घोरपडे सरकार यांचे वारसदार यशवंतराव घोरपडे सरकार हे महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत तसेच श्रीमंत भवानीसिंह घोरपडे सरकार ( सरसेनापती संताजी घोरपडे सरकार यांचे वंशज) यांच्या सह माजी खासदार जयवंतराव आवळे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, महानगरपालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे, पोलिस उपअधिक्षक समीरसिंह साळवे, भगतराम छाबड़ा, अॅड. शिवराज चुडमुंगे, धोंडीलाल शिरगावे, रविंद्र जावळे, इंद्रजीत बोंद्रे, पुष्कर पाटील यांच्यासह प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत. प्रथेनुसार छत्रपती शाह पुतळ्यापासून दुचाकी रॅली छत्रपती शिवाजी पुतळा मागे गांधी पुतळा ते गावभागातील अंबाबाई मंदिरा पर्यंत असेल व तसेच मंदिरापासून पासून शाही मिरवणूकीस प्रारंभ होईल.
त्यामध्ये उंट, घोडे, भालदार, चोपदार, अष्टप्रधान मंडळ, गोंधळी, मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके. ढोल-ताशा व तुतारी वाद्यांचा गजर असा भव्य लवाजामा असेल. प्रथेप्रमाणे मिरवणूक झेंडा चौक, राजवाडा मार्गे, गांधीपुतळा येथे आल्यानंतर नवचंडीकेचे पूजन होऊन कोहळा फोडण्याचा विधी होईल. त्यानंतर मिरवणूक दसरा चौकात आल्यानंतर स्वागत समारंभ होईल. त्यानंतर सार्वजनिक दसर्याचे मानकरी सुरेशदादा पाटील यांच्या हस्ते सिमोल्लंघनाचा कार्यक्रम होईल.
या सोहळ्यासाठी नागरिकांनी पारंपारिक वेशभूषेत यावी असे आवाहन श्री. पाटील यांनी केले आहे. यावेळी इचलकरंजी दसरा महोत्सव समिती चे अध्यक्ष मोहनराव माने, मधुकर पाटील, अमरजित जाधव, अॅड. सारंग जोशी, कल्पेश दंडगे यांच्यासह समितीचे प्रमुख उपस्थित होते.
इचलकरंजीत शाही दसरा विविध कार्यक्रमांनी साजरा करणार
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -