ऐन सणासुदीच्या तोंडावर डाळीच्या भावात वाढ झाली आहे. दसरा-दिवाळी तोंडावर डाळी महागल्याने सामान्य नागरिकांना त्याची झळ बसणार आहे. डाळींपासून तयार होणारे पदार्थ देखील महागले आहेत.
दिवाळीला तयार होणारे पदार्थांमध्ये डाळीचा समावेश असतो. परंतु आता डाळी 10 ते 12 रुपयांनी महाग झाल्या आहेत. जून जुलैपर्यंत डाळींचे भाव आटोक्यात होते.
ऑगस्टपासून भाव वाढायला सुरुवात झाली. पुरेसा पाऊस नसल्यामुळे डाळींचे भाव कडाडले. भविष्यात भाव अजून वाढण्याची शक्यता आहे. हरभरा डाळ 60 ते 75, तूर डाळ- 130-165, मूग डाळ रोजच्या दैनंदिन वापरातील डाळींचे भाव सर्वात जास्त आहेत.
वातावरण बदल झाला आहे. कधी पाऊस तर कधी तापमान पुरेसा पाऊस नसल्यामुळे भाव वाढले आहे. खरीप मूग आणि बाजरी हे पावसाच्या 2 महिन्यात येणारे पीक आहे. परंतु पाऊस नसल्यामुळे नुकसान झाले आहे शेतकऱ्यांकडे पैसे नाही बाजार शांत आहे.
डाळींचे भाव
हरभरा डाळ – 72 – 75, तूर डाळ – 145-162, मठ डाळ – 97- 98, मसूर डाळ – 75 – 80, उडीद डाळ – 110- 115