Monday, July 28, 2025
Homeब्रेकिंगऔषधांच्या बिलावर डिस्काउंट ? सावधान, FDA ची आहे नजर

औषधांच्या बिलावर डिस्काउंट ? सावधान, FDA ची आहे नजर

इतर राज्यांतून येणाऱ्या बनावट औषधांवर लक्ष केंद्रित केल्यानंतर आता महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासन विभागाने (FDA) औषध विक्रेत्यांद्वारे विविध औषधांवर देण्यात येणाऱ्या सवलतीवर आणि विक्रीवर लक्ष केंद्रित केले आहे. असे व्यवहार करणाऱ्यांवर आता थेट कारवाईचा दंडुका उगारला जाणार आहे.

 

औषधविक्रेत्यांद्वारे विविध औषधांवर सूट देण्यात येणारे फलक किंवा बोर्ड लावले जातात. तसेच अनेक औषधांवर सूट देऊन त्यांची विक्री देखील केली जाते. फार्मसी कौन्सिलच्या म्हणण्यानुसार ग्राहकांची दिशाभूल करण्यासाठी सवलत दाखवणारे बोर्ड आणि पॅम्फलेट लावणे चुकीचे आहे. मात्र, असे असतांनाही बिनदिक्कतपणे असे बोर्ड लावले जात असतात. त्यामुळे असे बोर्ड लावणाऱ्या आणि सूट देणाऱ्यांवर आता थेट कारवाई केली जाणार आहे.

 

अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त भूषण पाटील म्हणाले की, या प्रकारचे पॅम्प्लेट्स आणि डिस्प्ले बोर्ड लावणे हे फार्मसी प्रॅक्टिस रेग्युलेशन २०१५ च्या प्रकरण ७ मधील कलम १२.२ चे उल्लंघन करणारे आहेत. असे बोर्ड लावणे हे नैतिकदृष्ट्या योग्य नाही. त्यामुळे असे बोर्ड लवणाऱ्यांवर आता थेट कारवाई केली जाणार आहे.

 

एफडीएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, एफडीएच्या काही निरीक्षकांना “सवलतीत” औषधे विकणाऱ्या दुकानांची साखळी देखील समोर पुढे आली आहे. डिस्प्ले बोर्डवर दिलेली ८० टक्के सूट ही औषध घेणाऱ्यांना देण्यात आलेली नाही. औषध विक्रेत्यांची बिले तपासल्यावर ही धक्कादायक माहिती पुढे आली.

 

दरम्यान, या बाबत पाटील म्हणाले, आमच्याकडे मेडिकल स्टोअर्सवर कारवाई करण्याचे अधिकार नाही, त्यामुळे आम्ही अशा मेडिकल स्टोअरची नोंद करू आणि या बाबत फार्मसी कौन्सिलकडे तक्रार करू.

 

 

पाटील म्हणाले की, सर्व औषध निरीक्षकांना त्यांच्या तपासणीदरम्यान औषधांसह सवलत फलकांची तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गेल्या आठवड्यात, FDA ने सर्व किरकोळ विक्रेते आणि घाऊक विक्रेत्यांना महाराष्ट्रात आणण्यात येणाऱ्या बनावट औषधांवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्याबाहेरुण खरेदी करण्यात येणाऱ्या औषधांच्या प्रत्येक खरेदीची बिले ईमेल करण्यास सांगितले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -