Monday, August 4, 2025
Homeब्रेकिंगबारावीनंतर रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ग्रुप 'क' आणि 'ड'साठी भरती सुरू; जाणून घ्या...

बारावीनंतर रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ग्रुप ‘क’ आणि ‘ड’साठी भरती सुरू; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

 

भारतीय रेल्वेमध्ये १२ वी नंतर नोकरी करण्याची सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. जर तुम्हाला ही भारतीय रेल्वेमध्ये सरकारी नोकरी मिळवण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वेने नुकतीच गट क आणि ड च्या पदांच्या भरतीतीसाठी ऑनलाईन अर्ज मागवले आहेत.

रेल्वे भरती सेल (RRC) पश्चिम मध्य रेल्वे (WRC) ने एम्प्लॉयमेंट न्यूज (21-27 ऑक्टोबर 2023) मध्ये गट क आणि गट ड च्या पदांसाठी रेल्वेने ऑनलाईन अर्ज मागवले आहेत. ही भरती 2023-24 च्या वर्षासाठी केली जाणार आहे. शिवाय, पश्चिम मध्य रेल्वेमध्ये स्काऊट्स आणि गाईडच्या कोट्याअंतर्गत ही भरती केली जाणार आहे.न्यूज 18 हिंदीने दिलेल्या वृत्तानुसार, या नोकरीसाठी आणि पदांसाठी इच्छुक असणारे उमेदवार 6 नोव्हेंबर 2023 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाईन अर्ज करू शकतात. या भरतीच्या अधिसूचनेमध्ये दिलेल्या अतिरिक्त पात्रतेसह इयत्ता १० वी आणि १२ वी उत्तीर्ण झालेले उमेदवार जाहिरात क्रमांक 04/2023 च्या अंतर्गत पश्चिम मध्य रेल्वेमध्ये स्काऊट आणि गाईडच्या कोट्याअंतर्गत मोठ्या भरतीसाठी अर्ज करू शकतात.रेल्वेमध्ये भरती करण्यात येणाऱ्या पदांची संख्या किती?गट क (स्तर-२) : पदांची संख्या २गट ड (स्तर-१) : पदांची संख्या ६अर्जदाराची आवश्यक पात्रता खालीलप्रमाणे :क गटासाठी आवश्यक पात्रता – इयत्ता १२ वी(+2 टप्पा) किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून त्याच्या समकक्ष परीक्षेत उमेदवाराला 50% पेक्षा कमी गुण नसावेत. तसेच, अनुसूचित जाती/जमाती/माजी सैनिक/ अपंग (पीडब्लूडी) उमेदवारांसाठी 50% गुणांची आवश्यकता नाही, किंवा ज्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा पदव्युत्तर पदवीधर इत्यादी.या शिवाय, एखाद्या व्यक्तीची लिपीक सह टंकलेखक या श्रेणीमध्ये नियुक्ती केली असेल तर त्याची टायपिंगची क्षमता ३० शब्द प्रति मिनिट इतकी असणे आवश्यक आहे. तसेच, नियुक्तीच्या तारखेपासून ते दोन वर्षांच्या कालावधीमध्ये इंग्रजीत किंवा हिंदीमध्ये २५ शब्द प्रति मिनिट इतकी क्षमता असणे आवश्यक आहे आणि तोपर्यंत या श्रेणीतील त्या उमेदवाराची नियुक्ती ही तात्पुरती असेल.ड गटासाठी आवश्यक पात्रता (स्तर१)ड गटासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने १० वी उत्तीर्ण किंवा ITI किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेकडून समकक्ष किंवा NCVT द्वारे प्रदान केलेले राष्ट्रीय शिकाऊ प्रमाणपत्र (NAC) असणे आवश्यक आहे.निवड झालेल्या उमेदवारांना किती वेतन मिळणार ?गट क (स्तर २) : स्तर-२ (७ वा सीपीसी) (पे मॅट्रिक्स रू.१९९००-६३२००)गट ड (स्तर१) : स्तर-१ (७ वा सीपीसी) (पे मॅट्रिक्स रू. १८०००-५६९००)

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -