ताजी बातमी ऑनलाईन टीम
नागपूर- टोमॅटोपाठोपाठ आता कांद्याच्या दरातही विक्रमी वाढ होत असल्याचे व्यापाऱ्यांचे मत आहे. सध्या
नागपुरातील कळमना ठोक आलू-कांदे बाजारात दर्जानुसार ५० ते ६० रुपये आणि किरकोळमध्ये ८० रुपये किलो भाव आहे. केवळ आठवड्यातच २० रुपये किलोची वाढ झाली आहे. टोमॅटोनंतर आता कांद्याची शंभरीकडे वाटचाल सुरू आहे.
नोव्हेंबरअखेरीस वा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात नवीन कांदे बाजारात आल्यानंतरच भाव कमी होण्याची शक्यता ठोक व्यापारी गौरव हरडे यांनी व्यक्त केली.
वाढीव दरामुळे टोमॅटोप्रमाणेच लोक कांद्याची चव विसरायला लागतील, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. वाढीव दरामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर ताण येणार आहे. मागणीच्या तुलनेत कमी पुरवठा, हे मुख्य कारण समजले जात आहे.
आता कांदाही गाठणार शंभरी! सामान्यांना रडवणार; नवीन कांदा नोव्हेंबर अखेरीस येणार
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -