Monday, July 28, 2025
Homeब्रेकिंगOppo A79 5G : 16 GB रॅमसह Oppo ने लाँच केला जबरदस्त...

Oppo A79 5G : 16 GB रॅमसह Oppo ने लाँच केला जबरदस्त Mobile; किंमत किती?

 

 

चिनी ट्रेक ब्रँड Oppo भारतीय बाजारपेठेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्मार्टफोन सतत लॉन्च करत असते. आताही कंपनीने A सिरीज अंतर्गत Oppo A79 5G हा नवीन मोबाईल लाँच केला आहे. या मोबाईलचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यामध्ये तुम्हाला तब्बल 16GB रॅम मिळत आहे. तसेच मोबाईलची किंमत सुद्धा 20 हजार रुपयांच्या आतमध्ये आहे. नुकताच या स्मार्टफोनची 320 क्वालिटी टेस्ट आणि 130 एक्स्ट्रीम रिलायबिलिटी टेस्ट करण्यात आली. यात ड्रॉप, एंटी स्प्लेश, रेडिएशन, एक्स्ट्रीम वेदर, टेंपरेचर प्रोटेक्शन, फायर आणि सिग्नल टेस्ट यांचा समावेश आहे. आज आपण जाणून घेऊया या मोबाईलचे खास फीचर्सकॅमेरा– Oppo A79 5G

Oppo A79 5G या मोबाईलमध्ये देण्यात आलेल्या कॅमेरा क्वालिटी बद्दल बोलायचं झालं तर या स्मार्टफोनमध्ये पंच होल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या मध्ये 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 2 MP चा पोर्ट्रेट कॅमेरा आणि समोरील बाजूला 8 MP चा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. कंपनीने या मोबाईल मध्ये 5000 MAH बॅटरी दिली असून ही बॅटरी 33 W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

 

किंमत आणि ऑफर

Oppo A79 5G या स्मार्टफोनची किंमत 19,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा मोबाईल विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. कंपनीने या स्मार्टफोनसोबत ऑफर्स देखील उपलब्ध केल्या आहेत जेणेकरून ग्राहक कमी किमतीमध्ये स्मार्टफोन खरेदी करू शकतील. Oppo चा हा नवीन स्मार्टफोनवर ICICI Bank, SBI card, Kotak Bank, IDFC first Bank, Bank of Baroda credit card, AU Finance Bank, one bank या बँकांच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वरून Oppo A79 5G हा स्मार्टफोन खरेदी केल्यास 4000 रुपयांपर्यंत कॅशबॅक ऑफर देण्यात येत आहे. त्याचबरोबर या मोबाईलवर एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे. त्यानुसार कंपनीकडून 4000 रुपयांचा एक्सचेंज डिस्काउंट देण्यात येत आहे. त्याचबरोबर ग्राहक हा स्मार्टफोन नो कॉस्ट EMI च्या माध्यमातून खरेदी करू शकता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -