फेस्टिव सीजन दरम्यान ऑक्टोबर महिन्यात केंद्र सरकारने पेंशनर्स आणि केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठ गिफ्ट दिलय. केंद्र सरकारने पेंशनर्स आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केलीय.
DA आणि DR 1 जुलैपासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू होणार आहे. आता यामध्ये प्रश्न हा आहे की,. लोकांना कधी, कशी आणि किती रक्कम हाती पडणार आहे? त्या बद्दल जाणून घ्या. हाइक केल्यानंतर पेंशनर्स आणि कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ झालीय. 42 वरुन 46 टक्के महागाई भत्ता झालाय. केंद्र सरकारच्या विभागाने मेमोरेडम जारी केलाय. त्यात कुठल्या पेंशनर्स महागाई भत्त्याचा लाभ मिळणार? आणि वाढलेला भत्त कधी मिळणार? त्या बद्दल माहिती देण्यात आलीय.
DOPPW नुसार, सेंट्रल गर्व्हमेंटचे पेंशनर्स, फॅमिली पेंशनर्स, डिफेंस सेक्टरमधील आर्म फोर्सचे पेंशनर, सिविलियन पेंशनर, ऑल इंडिया सर्विस पेंशनर्स, रेल्वेचे पेंशनर, प्रोविजन पेंशनवाले आणि बर्मातून आलेल्या काही पेंशनर्सना DR मधल्या वाढीचा फायदा होणार आहे. त्याशिवाय न्याय विभागाच्या आदेशानुसार, रिटायर सुप्रीम कोर्टच्या जजनासुद्धा DR बेनिफिट मिळू शकतो.
किती वाढणार पेंशन?
केंद्र सरकारने पेंशनर्ससाठी DR मध्ये 4 टक्के वाढ दिलीय. जर पेंशनर्सची बेसिक पेंशन 40 हजार रुपये आहे, तर 42 टक्के DR च्या हिशोबाने महागाई भत्ता 16 हजारापेक्षा जास्त होतो. नव्या वाढीनंतर बेसिक पेंशनमध्ये महागाई भत्ता 18 हजारपेक्षा जास्त असेल. म्हणजे पेंशनर्सना दर महिन्याला 1 हजार रुपयांपेक्षा जास्त पेंशन मिळेल.
कधी मिळणार पैसे?
- इकोनॉमिक टाइम्सच्या रिपोर्टनुसार, सरकारने बँकांना लवकरात लवकर पेंशन जारी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी कोणत्या सूचनांची वाट पाहू नका. सरकारच्या घोषणेनंतर कुठल्याही क्षणी लोकांच्या खात्यात वाढीव रक्कम जमा होऊ शकते.