Sunday, August 3, 2025
Homeब्रेकिंगमराठा आंदोलकांचा उद्रेक; मराठवाड्यातील आमदाराचं घर पेटवलं

मराठा आंदोलकांचा उद्रेक; मराठवाड्यातील आमदाराचं घर पेटवलं

मराठा आंदोलकांचा उद्रेक; मराठवाड्यातील आमदाराचं घर पेटवलं

मराठा आरक्षणाता मुद्दा गेल्या दर दिवसागणिक आणखी पेट घेताना दिसत असून, मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानं पुन्हा एकदा ही ठिणगी धुमसताना दिसू लागली आहे. सध्या राज्याच्या बहुतांश भागांमध्ये मराठा आंदोलकांनी आरक्षणाची मागणी उचलून धरत गावबंदीही केल्याचं पाहायला मिळत असून, काही ठिकाणी नेतेमंडळी आणि शासकीय प्रतिनिधींनाही गावखेड्यांमध्ये आंदोलकांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. सोमवारी मराठा आंदोलनाला अधिकत हिंसक स्वरुप प्राप्त झालं.

 

माजलगावमध्ये ठिकठिकाणी आंदोलकांकडून वाहनांना आग लागण्यात आलेली आहे तर शहरात अनेक ठिकाणी धुराचे लोटच्या लोट उसळल्याचं पाहायला मिळालं. सोमवारी सकाळपासूनच आरक्षणाच्या मुद्द्यावरून कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते यात अनेक ठिकाणी आंदोलकांनी आग लावली. तर, आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरालादेखील पार्किंगच्या भागांमध्ये आग लावल्याचं वृत्त समोर आलं. यामध्ये चार चाकी आणि दुचाकी गाड्या जळून राख झाल्याचं पाहायला मिळालं

 

सोळंके यांच्यावर इतका रोष का?

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून माजलगावातील राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याचं म्हटलं गेलं होतं. या क्लिपमध्ये त्यांनी मनोज जरांगे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा दावा मराठा समाजाकडून करण्यात आला होता. याच रोषातून सोमवारी मराठा समाजातील आक्रमक आंदोलनांनी त्यांच्या घरावर मोर्चा काढत दगडफेक सुरु केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -