ऑक्सफर्ड ऑफ युनिव्हर्सिटी (university of oxford) अशी ओळख असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आठ नंबर हॉस्टेलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर लिहिण्यात आल्याचं सांगितलं जातंय. या विरोधात आज भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आंदोलन केलं जाणार असल्याची माहिती भाजपाचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी दिली. तर या प्रकरणी विद्यापीठ प्रशासनानं गुन्हा दाखल करावा, अशी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं मागणी केली.
विद्यापीठातच (university of oxford) पंतप्रधान मोदी यांच्याविषयी मजकूर लिहिल्याने विद्यार्थ्यांसह शिक्षकांमध्ये खळबळ उडालीये. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी सावित्रीबाई फुले विद्यापीठातील भिंतीवर आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने शुक्रवारी सायंकाळी विद्यापीठ परिसरात आंदोलन करणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहात आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याप्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत डॉ. महेश रघुनाथ दवंगे यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
13 जणांवर गुन्हे दाखल
दरम्यान, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांमध्ये सभासद नोंदणीवरून हाणामारी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी दोन संघटनांनी परस्पर विरोधात चतुःशृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून 13 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. ही घटना ताजी असतानाच आता पंतप्रधानांबद्दल भिंतीवर आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याचं समोर आल्यानं विद्यापीठ परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
२ नोव्हेंबर रोजी रात्री ८.३० वाजता ही घटना घडली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ कॅम्पसमधील मुलांचे वसतीगृह क्र .८ येथील कपडे धुण्याच्या ठिकाणी अक्षेपार्ह मजकूर लिहिला होता. भिंतीवर काळ्या रंगाच्या पेंटने इंग्रजी अक्षरामध्ये लिहिलं होतं. इतरांना त्रास होईल अशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणी अश्लील लिखाण करण्याचे कृत्य करुन पुणे विद्यापिठाची बदनामी केली म्हणून अनोळखी इसमाविरुध्द दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आलाय.