Saturday, July 27, 2024
Homeकोल्हापूरVIDEO>>आमच्या उसातनं तुम्ही घ्या बोनस ... आम्ही बसतो रिकामं...! शेतकऱ्यांचा प्रश्नाने कारखान्याचा...

VIDEO>>आमच्या उसातनं तुम्ही घ्या बोनस … आम्ही बसतो रिकामं…! शेतकऱ्यांचा प्रश्नाने कारखान्याचा अधिकारी गप्पगार !

ताजी बातमी ऑनलाईन टीम

कोल्हापूर; सणवार जवळ आलाय…. घरात बाजार भरायला…..मुलांच्या कपडे खरेदीला पैसे नाहीत… अशी शेतकऱ्यांची परिस्थिती आहे. त्यात तुम्ही ऊसदर जाहीर न करता ऊस कसा काय नेताय…असा प्रश्न विचारून शेतकऱ्यांनी हुपरी येथील जवाहर – आवाडे साखर कारखान्याच्या प्रशासनाला धारेवर धरले. शेतकऱ्यांनी
एवढ्यावरच न थांबता आमच्या उसातनं तुम्ही बोनस घ्या….आणि आम्ही रिकामचं बसतो असे म्हणून शेतकऱ्यांनी कारखाना प्रशासनाला आरसा दाखवला. या घटनेचा व्हिडीयो सोशल मीडीयावर व्हायरल झाल्याने ऊसप्रश्न येत्या काही दिवसात वेगळ्या वळणावर असल्याचे जाणवते.

सणवार जवळ आलाय…. घरात बाजार भरायला…..मुलांच्या कपडे खरेदीला पैसे नाहीत… अशी शेतकऱ्यांची परिस्थिती आहे. त्यात तुम्ही ऊसदर जाहीर न करता ऊस कसा काय नेताय…असा प्रश्न विचारून शेतकऱ्यांनी हुपरी येथील जवाहर – आवाडे साखर कारखान्याच्या प्रशासनाला धारेवर धरले.

शेतकऱ्यांनी एवढ्यावरच न थांबता आमच्या उसातनं तुम्ही बोनस घ्या….आणि आम्ही रिकामचं बसतो असे म्हणून शेतकऱ्यांनी कारखाना प्रशासनाला आरसा दाखवला. या घटनेचा व्हिडीयो सोशल मीडीयावर व्हायरल झाल्याने ऊसप्रश्न येत्या काही दिवसात वेगळ्या वळणावर असल्याचे जाणवते.

महाराष्ट्रातील ऊस हंगाम गेल्या 1 तारखेपासून चालु राहतील
असा शासनाने जाहीर केले. मात्र मागील हंगामातील 400 रूपये आणि चालू गाळप हंगामात गाळप होणाऱ्या उसाला प्रतिटन किमान 3500 रूपये विनाकपात पहिला हप्ता देण्याची मागणी सर्वच शेतकरी संघटनांनी केली आहे. ही मागणी मान्य नाही झाली तर कारखाने सुरु करताना कारखानदारांना मोठा संघर्ष करावा लागेल असे आव्हान दिले आहे. त्यामुळे गळित हंगाम सुरु झाला तरी संघर्षाच्या भीतीने राज्यातील बहूतेक कारखाने बंदच आहेत..

काल शेतकरी संघटना आणि साखर कारखानदारांच्या प्रतिनिधींमद्ये झालेल्या बैठकीमध्ये तोडगा निघेल असे वाटत होते पण बोलणी फिस्कटल्याने उस गळीत हंगाम लाबण्याची चिन्हे दिसत आहेत. महाराष्ट्र – कर्नाटक सीमेवर असलेले काही कारखाने महाराष्ट्राबाहेरील किंवा आसपासचा ऊस आणून कारखाना चालु करण्याच्या प्रयत्नात असताना शेतकऱ्यांनी उसवाहतूक अडवल्याचे प्रकार घडत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -