Monday, December 23, 2024
Homeब्रेकिंगमहागड्या कार, अनेक घरे… सापाचं विष आणणारा एल्विश यादव कोण?; अचानक कसा...

महागड्या कार, अनेक घरे… सापाचं विष आणणारा एल्विश यादव कोण?; अचानक कसा आला चर्चेत?


एल्विश यादव हा मोठ्या वादात सापडलाय. एल्विश यादव हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असलेले नाव आहे. नुकताच एल्विश यादव याच्यावर काही गंभीर आरोप करण्यात आले. थेट एल्विश यादव याचे नाव रेव्ह पार्टीमध्ये आले. इतकेच नाही तर या रेव्ह पार्टीमध्ये अनेक सापांचे विष देखील आढळले. सापांच्या विषाची नशा या पार्टीत केली गेली. यामुळे सर्वचजण हैराण झाल्याचे बघायला मिळाले.

या रेव्ह पार्टीमध्ये फक्त सापांचे विषच नाही तर थेट विदेशातून मुली देखील मागवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. याप्रकरणात मोठे खुलासे देखील होताना दिसत आहेत. एल्विश यादव याच्यासह पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आली. नोएडामध्ये रेव्ह पार्टीचे आयोजन करण्यात आले. याप्रकरणात एल्विश यादव याचे नाव आल्याचे सर्वजण हैराण झाले.

एल्विश यादव सतत चर्चेत आहे. विशेष म्हणजे एल्विश यादव हा एक जबरदस्त असे लग्झरी आयुष्य जगतो. फक्त भारतामध्येच नाही तर एल्विश यादव याची घरे विदेशात देखील आहेत. एल्विश यादव याच्यावर अनेक मोठ्या लग्झरी गाड्यांचे कलेक्शन देखील आहे. आज कोट्यवधी संपत्तीचा मालक एल्विश यादव हा नक्कीच आहे.

एल्विश यादव हा एक फेमस यूट्यूबर आहे. शॉर्ट चित्रपटांची देखील एल्विश यादव हा निर्मिती करतो. एल्विश याचे एक चॅनल देखील आहे आणि या चॅनलच्या माध्यमातून तो आपल्या लाईफबद्दल चाहत्यांना अपडेट देताना दिसतो. गुरुग्राम जवळच्या वजीराबाद येथील रहिवाशी एल्विश यादव हा असून तो 25 वर्षांचा आहे. दिल्लीच्या हंसराज कॉलेजमध्ये एल्विश यादव याने बीकॉम केले.

एल्विश यादव याच्या घराची किंमत आज कोट्यवधीच्या आसपास आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तगडी कमाई एल्विश यादव हा करतो. सोशल मीडियावर त्याची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. एल्विश यादव हा बिग बाॅस ओटीटी 2 चा विजेता देखील आहे. बिग बाॅस ओटीटी 2 च्या घरात धमाकेदार गेम खेळताना एल्विश यादव हा दिसला. विशेष म्हणजे बिग बाॅसनंतर त्याच्या फॅन फाॅलोइंगमध्ये देखील मोठी वाढ झालीये.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -