Saturday, August 2, 2025
Homeब्रेकिंगप्रत्येक विवाहित महिलेला मिळणार 12000 रुपये!

प्रत्येक विवाहित महिलेला मिळणार 12000 रुपये!

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी रायपूरमध्ये छत्तीसगड विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. भाजपने याला ‘मोदीज गॅरंटी 2023 फॉर छत्तीसगड’ असे नाव दिले आहे.

 

भाजपने आपल्या जाहीरनाम्यात तरुण, बेरोजगार, महिला आणि शेतकरी यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. तसेच प्रत्येक विवाहित महिलेला दरवर्षी १२ हजार रुपये दिले जाणार असल्याची घोषणा यात करण्यात आली आहे.

 

यावेळी माजी मुख्यमंत्री रमण सिंह देखील उपस्थित होते. छत्तीसगडमधील विधानसभेच्या एकूण 90 जागांसाठी 7 आणि 17 नोव्हेंबर रोजी दोन टप्प्यात मतदान होणार असून मतमोजणी 3 डिसेंबर रोजी होणार आहे.

 

छत्तीसगडला वेगळे राज्य बनवण्याच्या उद्देशात भूपेश बघेल यांचे सरकार सर्वच बाबतीत अपयशी ठरले आहे, असे अमित शाह म्हणाले. ते म्हणाले की, रमणसिंग यांच्या पंधरा वर्षांच्या कार्यकाळामुळे छत्तीसगड हे इतर राज्यापेक्षा चांगले राज्य बनले आहे. आता येत्या पाच वर्षात त्याचा संपूर्ण विकास करू, अशी ग्वाही राज्यातील जनतेला द्यायची आहे.

 

छत्तीसगडच्या जनतेला भाजपची प्रमुख आश्वासने

 

महतारी वंदन योजनेंतर्गत प्रत्येक विवाहित महिलेला दरवर्षी १२ हजार रुपये दिले जातील.

 

दोन वर्षांत १ लाख रिक्त पदांची भरती केली जाईल

 

छत्तीसगडमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत १८ लाख घरे बांधली जाणार आहेत.

 

कृषी उन्नती योजना सुरू करण्यात येणार असून, यामध्ये प्रति एकर २१ क्विंटल धान ३१०० रुपये प्रति क्विंटल या दराने खरेदी करण्यात येणार आहे.

 

रायपूरमध्ये एक इनोव्हेशन हब तयार केला जाईल. ज्यामुळे 6 लाखांहून अधिक लोकांना रोजगार मिळेल.

 

निर्मल जल योजनेतून छत्तीसगडमधील प्रत्येक घरापर्यंत पाणी पुरवठा केला जाईल.

 

आयुष्मान भारत योजनेंतर्गत सर्व कुटुंबांना 5 लाखांव्यतिरिक्त 10 लाख रुपयांपर्यंतचे उपचार दिले जातील.

 

गरीब कुटुंबांना ५०० रुपयांना गॅस सिलिंडर देणार.

 

नवीन उद्योगांसाठी ५० टक्के सबसिडी देणार.

 

एनसीआरच्या धर्तीवर, रायपूर, नया रायपूर, दुर्ग भिलाई यांना जोडून एक नवीन एससीआर तयार केला जाईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -