Saturday, March 15, 2025
Homeइचलकरंजीइचलकरंजी ; एसटीला थडकून मोराचा मृत्यू कोंडीगिरी फाटा येथील हायवे वरील घटना

इचलकरंजी ; एसटीला थडकून मोराचा मृत्यू कोंडीगिरी फाटा येथील हायवे वरील घटना

ताजी बातमी ऑनलाईन टीम

इचलकरंजी सोलापूर मार्गे जाणारी सकाळी सात वाजताची बस कोंडीगिरी फाटा येथील हायवे वरून जात असताना एका वृक्षावरील मोराने आकाशाकडे झेप घेत असताना मधेच भरधाव एसटी आल्याने एसटीला धडकून मोर जागीच गतप्राण झाला. घटनास्थळी वन विभागाचे वनरक्षक अरुण खामकर व पोलीस अधिकाऱ्यानी पंचनामा केला आहे याबाबतची फिर्याद एसटी चालक सिद्धाराम येळसंगे याने नोंद केली आहे.



इचलकरंजी जयसिंगपूर जाणाऱ्या मुख्य हायवेवर प्रचंड रहदारी असते अशीच सकाळी इचलकरंजी ते सोलापूर ही बस डेपोतून निघालेली बस कोंडीगिरी फाटा येथे आली असता भरधाव जाणाऱ्या एसटीला आकाशात उडणाऱ्या मोराची धडक बसच्या काचेला झाल्याने मोर धडकून खाली पडला. काही क्षणात खाली उतरून एसटी चालक व कंडक्टर यांनी तळमळणाऱ्या मोराला पाणी पाजले परंतु तो काही क्षणात मृत्यू पावला. सदरची घटना समजतात वनविभागाचे वनरक्षक अरुण खामकर व पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला व दफन विधीसाठी वन विभागाकडे सपूर्द करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -