ताजी बातमी ऑनलाईन टीम
इचलकरंजी : माजी खा. राजू शेट्टींच्या आक्रोश पदयात्रेचे सोमवारी दि. ६ सायंकाळी ५ वाजता इचलकरंजीमध्ये आगमन होत आहे. ही पदयात्रा पंचगंगा कारखान्यापासून डेक्कन चौक, अटलबिहारी वाजपेयी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक, शिवतीर्थ, के. एल. मलाबादे चौक, महात्मा गांधी पुतळा चौक ते राजावाडा चौकमार्गे कुरुहीन शेट्टी भवन येथे मुक्काम करणार आहेत. यामुळे इचलकरंजीकरांनी एक दिवसाच्या भाकरीची व्यवस्था करून पुण्याचं कर्म करावे, असे आवाहन इचलकरंजी स्वाभिमानीचे शहराध्यक्ष विकास चौगुले यांनी केले आहे.