लष्करातील (army) महिला अधिकाऱ्यांप्रमाणे भारतीय सैन्यात कार्यरत महिला सैनिक, सेलर्स आणि एअर वॉरियर्स यांनाही आता मातृत्व, मुलांचे संगोपण आणि मूल दत्तक घेण्यासाठी सुट्या आणि आवश्यक सुविधा दिल्या जाणार आहे. संरक्षण मंत्रालयाने या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. यामध्ये अग्निवीरांचाही समावेश आहे. आतापर्यंत सैन्यातील फक्त वरिष्ठ पदांवरील महिला अधिकाऱ्यांनाच मातृत्व आणि बाल संगोपणासाठी सुट्या मिळत होत्या.
नरेंद्र मोदी सरकारने सशस्त्र दलातील महिला (army) जवानांना दिवाळीपूर्वी मोठी भेट दिली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी एका ऐतिहासिक प्रस्तावाला ग्रीन सिग्नल दिला आहे, ज्यामध्ये महिला सैनिक, सेलर्स, (नौदल) आणि एयर वॉरियर्स (वायुसेना) यांना अधिकाऱ्यांच्या बरोबरीने मातृत्व, बाल संगोपन आणि मूल दत्तक संदर्भात रजा मिळेल. आता वन रुल-ऑल रॅंक नियम लागू होईल.वैयक्तिक आणि व्यवसायिक जीवनात संतुलन साधता येणार
संरक्षण मंत्रालयाने घेतलेला हा निर्णय लष्करातील सर्व महिलांसाठी महत्त्वाचा आहे, मग त्यांची रँक कोणतीही असो. लष्करातील महिला सैनिकांना आता त्यांचे कौटुंबिक आयुष्य आणि व्यवसायिक जीवन यात संतुलन राखण्यासाठी मदत होणार आहे. त्यासोबतच यामुळे लष्करी सेवेतील महिलांच्या कामावरही याचा सकारात्मक परिणाम होणार असल्याचे संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
सैनिकांच्या देशभक्तीने देश बळकट होईल
मंत्रालयाचे म्हणणे आहे की, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार ‘नारी शक्ती’ला स्वावलंबी आणि सशक्त बनवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. आता तिन्ही सैन्यातील महिला सैनिकांना अधिकार्यांना समान रजा देऊन एक आदर्श बदल करण्यात आला आहे. महिला अग्निवीरांच्या भरतीमुळे, देशाच्या जमीन, सागरी आणि हवाई सीमांचे रक्षण करण्यासाठी महिला सैनिक, सेलर्स आणि एयर वॉरियर्स यांच्या शौर्य, समर्पण आणि देशभक्तीमुळे सशस्त्र दल सक्षम होईल.