Monday, December 23, 2024
Homeब्रेकिंगदिवाळीनंतर आनंदाची बातमी! गॅस सिलिंडर 57 रुपयांनी झाला स्वस्त, काय आहेत नवीन...

दिवाळीनंतर आनंदाची बातमी! गॅस सिलिंडर 57 रुपयांनी झाला स्वस्त, काय आहेत नवीन दर?

 

दिवाळीनंतर एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ झाल्याच्या बातम्या येत असतानाच आता दिलासा देणारी बातमी आली आहे. तेल कंपन्यांनी आज, गुरुवार, 16 नोव्हेंबर 2023 रोजी व्यावसायिक सिलिंडरच्या किंमती कमी केल्या आहेत

19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत थोडासा दिलासा मिळाला आहे. तेल कंपन्यांनी (OMCs) किंमत 57.50 रुपयांनी कमी केली आहे. नवे दर आजपासून लागू झाले आहेत.

 

दिवाळीपूर्वी 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या दरात 101.50 रुपयांची वाढ करण्यात आली होती. मात्र, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही.

 

नवीन दर काय आहेत?

 

नवीन बदलानंतर, 19 किलोच्या सिलेंडरची किंमत दिल्लीत 1755.50 रुपये, कोलकात्यात 1885.50 रुपये, मुंबईत 1728 रुपये आणि चेन्नईमध्ये 1942 रुपये प्रति सिलेंडर आहे.

घरगुती सिलेंडरची किंमत किती आहे?

 

घरगुती सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. 14.2 किलोच्या सिलेंडरची किंमत दिल्लीत 903 रुपये, कोलकात्यात 929 रुपये, मुंबईत 902.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 918.50 रुपये प्रति सिलेंडर आहे.

 

दिवाळीच्या आधी म्हणजेच 1 तारखेला व्यावसायिक सिलिंडरचे दर 101.50 रुपयांनी वाढले होते. त्याचबरोबर घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही.सरकारने 30 ऑगस्ट रोजी 200 रुपयांची कपात केली होती

 

30 ऑगस्ट रोजी घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत बदल करण्यात आला होता. त्यावेळी सरकारने गॅस सिलिंडरच्या दरात 200 रुपयांची कपात केली होती. तसेच उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी 400 रुपयांची कपात जाहीर करण्यात आली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -