Saturday, July 27, 2024
Homeब्रेकिंगGoogle Pay आणि PhonePe वापरकर्त्यांनो लक्ष द्या! 31 डिसेंबरनंतर करता येणार नाही...

Google Pay आणि PhonePe वापरकर्त्यांनो लक्ष द्या! 31 डिसेंबरनंतर करता येणार नाही ऑनलाइन व्यवहार; जाणुन घ्या नेमकं प्रकरण

 

 

आज आपल्या देशात ऑनलाइन पद्धतीने पेमेंट करण्याचा ट्रेड वाढला आहे. आज अनेकजण घरी बसून काही मिनिटात ऑनलाइन पेमेंटच्या मदतीने हजारो रुपयांचा व्यवहार सहज करत आहे.

मात्र आता अनेकांना धक्का बसण्याची शक्यता आहे.

कारण बँक लवकरच UPI आयडी संदर्भात नवीन निर्णय जाहीर करणार आहे.

 

समोर आलेल्या माहितीनुसार नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने बँकेला Google Pay, PhonePe सारख्या थर्ड पार्टी अॅप्लिकेशनच्या ग्राहकांची ओळख पटवण्याचे आदेश दिले आहेत. ज्यांनी गेल्या 1 वर्षापासून UPI आयडी वापरला नाही. यासोबतच UPI आयडी आणि NPCI वर बंदी घालण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

 

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने दिलेल्या आदेशानंतर, बँक अशा ग्राहकांची ओळख करेल ज्यांनी UPI ID शी लिंक केलेल्या मोबाईल नंबरद्वारे 1 वर्षापासून कोणत्याही प्रकारचे क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वापरलेले नाही. यानंतर, नवीन वर्षातही त्या ग्राहकांना कोणत्याही प्रकारचे व्यवहार करण्याची परवानगी दिली जाणार नाही.

 

31 डिसेंबरनंतर व्यवहार पूर्णपणे बंद होतील

 

NPCI ने UPI आयडी ओळखण्यासाठी बँका आणि थर्डपार्टी सेवा प्रदान करणाऱ्या सर्व अॅप्सना 31 डिसेंबरपर्यंत वेळ दिला आहे. या निर्देशांचा एकच उद्देश आहे की, कोणतेही चुकीचे व्यवहार होऊ नयेत, म्हणजे पैशाचा गैरवापर होऊ नये.

 

वास्तविक, अनेक वेळा असे घडते की जेव्हा लोक आपला मोबाईल नंबर बदलतात तेव्हा ते त्याच्याशी संबंधित UPI आयडी विसरतात आणि अनेक दिवस तो नंबर बंद राहतो. त्यामुळे तो नंबर दुसऱ्याला दिला जातो.

 

अशा परिस्थितीत चुकीच्या ऑनलाइन व्यवहारांना आळा घालण्यासाठी हा विशेष निर्णय घेण्यात आला असून, त्यानंतर या चुकीच्या ऑनलाइन व्यवहारांवर बऱ्याच अंशी नियंत्रण येईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -