Wednesday, July 30, 2025
Homeब्रेकिंगद ग्रेट खली'च्या घरी गुडन्यूज; हरमिंदर कौरने दिला गोंडस बाळाला जन्म

द ग्रेट खली’च्या घरी गुडन्यूज; हरमिंदर कौरने दिला गोंडस बाळाला जन्म

 

डब्लू ईमध्ये भारताचा डंका गाजवणारा द ग्रेट खलीच्या घरी गुडन्यूज आली आहे. द ग्रेट खली म्हणजेच दिलीप सिंह राणा आता वडिल बनले आहेत. त्यांनी इंस्टा अकाऊंटवरुन एक रील शेअर केला आहे.त्यामध्ये, ते एका जन्मजात बाळासह दिसून येत आहेत. तसेच, या रीलसह त्यांनी कॅप्शनही लिहिलं असून, आपल्या शुभेच्छांमुळे आज मी एका मुलाचा बाप बनलो, असं त्यांनी म्हटलं. द ग्रेट खलीने स्वत:च चाहत्यांना ही गुडन्यूज दिली. दरम्यान, खली यांना पहिली एक मुलगी आहे.

 

द ग्रेट खलीच्या पत्नीचं नाव हरमिंदर कौर आहे. दोघांचे लग्न २००२ साली झाले होते. खलीची पत्नी हरमिंदर कौर या मूळ जालंदरच्या नूरमहल गावच्या रहिवाशी असून त्यांनी दिल्ली विद्यापीठातून पदवी घेतली आहे. विशेष म्हणजे दोघांच्या लग्नानंतर खलीने रेसलिंगमध्ये, डब्लडब्लूईमध्ये नशिब आजमावले, त्यानंतरच त्यांना देशात आणि विदेशात सर्वजण ओळखू लागले.

 

खली आणि हरमिंदर यांना लग्नाच्या १२ वर्षानंतर पहिली मुलगी झाली. फेब्रुवारी २०१४ मध्ये हरमिंदर यांनी एका कन्येला जन्म दिला. त्यानंतर, आता ९ वर्षांनी पुन्हा एकदा हरमिंदर यांनी बाळाला जन्म दिला असून ते बाळ मुलगा आहे. त्यामुळे, खली आणि हरमिंदर यांना मोठा आनंद झाला आहे. खलीच्या मुलीचे नाव अवलीन राणा असं आहे. आता, मुलाचे नाव काय ठेवतील याची सर्वांनाचउत्सुकता राहिल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -