Monday, July 28, 2025
Homeक्रीडाINDvsAUS T20 मालिकेतील आज पहिला सामना कुठे, कधी आणि कसा पाहता येईल?

INDvsAUS T20 मालिकेतील आज पहिला सामना कुठे, कधी आणि कसा पाहता येईल?

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघ विश्वचषक 2023 अंतिम सामन्यानंतर पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर दोन हात करण्यासाठी सज्ज झाले आहेत. दोन्ही संघात गुरुवारपासून (दि. 23 नोव्हेंबर) 5 सामन्यांच्या टी20 मालिकेला सुरुवात होत आहे.

 

पहिला सामना विशाखापट्टणम येथे भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 7 वाजता सुरू होणार आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध अंतिम सामन्यात मिळालेल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी तयार असल्याचे दिसत आहे. चला तर, या सामन्याविषयी सर्वकाही माहिती जाणून घेऊयात…

 

मोफत पाहता येईल लाईव्ह स्ट्रीमिंग

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS T20) संघातील 5 सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. भारताचे नेतृत्व सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याच्या खांद्यावर आहे, तर ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व मॅथ्यू वेड (Matthew Wade) करणार आहे. टी20 मालिकेतील सामन्यांचे प्रसारण मोबाईलवर जिओ सिनेमा ऍपवर पाहता येणार आहेत. तसेच, स्पोर्ट्स 18 आणि कलर्स सिनेप्लेक्स चॅनेलवरही सामन्यांची लाईव्ह स्ट्रीमिंग पाहिला जाऊ शकते.

 

भारतीय संघ

सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), इशान किशन, यशस्वी जयसवाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वाशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, मुकेश कुमार

 

ऑस्ट्रेलिया संघ

मॅथ्यू वेड (कर्णधार), ऍरॉन हार्डी, जेसन बेहरेन्डोर्फ, सीन ऍबॉट, टीम डेविड, नेथन एलिस, ट्रेविस हेड, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, तन्वीर सांघा, मॅट शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, मार्कस स्टॉयनिस, केन रिचर्डसन, ऍडम झम्पा

 

 

भारत-ऑस्ट्रेलिया टी20 मालिकेचे वेळापत्रक

पहिला सामना- 23 नोव्हेंबर, विशाखापट्टणम

दुसरा सामना- 26 नोव्हेंबर, त्रिवेंद्रम

तिसरा सामना- 28 नोव्हेंबर, गुवाहाटी

चौथा सामना- 1 डिसेंबर, नागपूर

पाचवा सामना- 3 डिसेंबर, हैदराबाद

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -