Tuesday, July 29, 2025
Homeब्रेकिंगबिटकॉइनद्वारे 10 लाख डॉलर्स न दिल्यास मुंबई विमानतळ बॉम्बने उडवून देण्याची धमकी

बिटकॉइनद्वारे 10 लाख डॉलर्स न दिल्यास मुंबई विमानतळ बॉम्बने उडवून देण्याची धमकी

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (CSMIA) टर्मिनल 2 ला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली आहे.

 

गुरुवारी रात्री उशीरा एका इमेलद्वारे ही धमकी देण्यात आली.

 

सूत्रांनी सांगितले की, हा धमकीचा इमेल पाठवणाऱ्या व्यक्तीने हा स्फोट टाळण्यासाठी 48 तासांच्या आत 10 लाख डॉलर्स देण्याची मागणी केली आहे. ही रक्कम बिटकॉईनमध्ये देण्यासही सांगितले आहे.

 

एका अधिकाऱ्याने सांगितले की, पोलिसांनी या प्रकरणी एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर नोंदवला ज्याने “quaidacasrol@gmail.com” हा इमेल आयडी वापरून धमकीचा मेल पाठवला.

 

पोलिसांनी सांगितले की, आरोपींनी गुरुवारी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (MIAL) च्या फीडबॅक इनबॉक्समध्ये हा इमेल पाठवला होता. धमकीच्या मलमध्ये आरोपीने लिहिले होते, “तुमच्या विमानतळासाठी ही अंतिम चेतावणी आहे. असे न झाल्यास, आम्ही विमानतळाच्या टर्मिनल 2 वर 48 तासांच्या आत बॉम्बस्फोट करू, अन्यथा आम्हाला बिटकॉइनमध्ये एक दशलक्ष डॉलर्स पाठवावे.”

 

ही धमकी मिळाल्यानंतर विमानतळाची सुरक्षा आणखी वाढवण्यात आली आहे. विमानतळाकडून मिळालेल्या तक्रारीत, MIAL अधिकारी विस्मय पाठक यांनी पोलिसांना सांगितले की, “धमकीचा इमेल आला तेव्हा मी विमानतळाच्या गुणवत्ता आणि ग्राहक सेवा केंद्रात होतो. खंडणी न दिल्यास ४८ तासांत विमानतळावर बॉम्बस्फोट करण्याची धमकी या इमेलमध्ये देण्यात आली होती.”

 

याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध आयपीसी कलम ३८५ ५०५ (१) (बी) अन्वये धमकी देऊन खंडणी मागितल्याप्रकरणी एफआयआर दाखल केला आहे.

 

सूत्रांनी सांगितले की, ज्या आयपी अॅड्रेसचा वापर करून हा धमकीचा इमेल पाठवण्यात आला होता त्याचा शोध घेण्यात आला आहे. तो पाठवणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवण्यात पोलीस आता व्यस्त आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -