काल उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रासह, कोकण व विदर्भाच्या अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाने हजेरी लावली. अनेक ठिकाणी गारपीट झाल्याने द्राक्षासारख्या पिकांचे नुकसान झाले आहे.
दरम्यान बुधवार दि. २९ नोव्हेंबरपासून मात्र हळूहळू थंडीची सुरवातीची शक्यताही जाणवत असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. तर सोमवार व मंगळवारीही राज्यात अनेक भागांत वादळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात (५ ते ६ डिसेंबर) बंगालच्या उपसागरात पुन्हा एखाद्या चक्रीवादळाची शक्यता आहे. बांगलादेशकडे त्याची वाटचाल राहू शकते. त्यामुळे महाराष्ट्राला त्याचा धोका नाही. विजांच्या कडकडाटासह
मुंबईसह कोकण किनारपट्टी, मध्य व दक्षिण महाराष्ट्राचा काही भाग, उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्याचा काही भागात यलो अलर्ट आहे. तर विदर्भ व पूर्व मराठवाड्यातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात (उद्या २७ ला) पावसाची तीव्रता आहे. २६ ला गारपीट होण्याची शक्यता आहे. विदर्भातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाट व गारांसह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातही काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह गारपीट व वादळी
पाऊस होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तविली आहे.
तर कोकण किनारपट्टीचा काही भाग आणि मराठवाड्यातील काही भागात विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात बलो अलर्ट देण्यात आलेला असून विदर्भातील काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हा पाऊस रब्बीतील ज्वारी, हरबरा पिकांना वरदान ठरण्याची शक्यता आहे. उर्वरित महाराष्ट्रात ढगाळ वातावरणाचीच शक्यता अधिक जाणवते, त्यामुळे थंडीचा कडाका कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्तकेली आहे.