राज्यात एसटी अपघाताची मालिका सुरूच आहे. जिल्ह्यातून मोठी बातमी समोर येत आहे. कोल्हापूरमध्ये एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये अनेक प्रवासी जखमी झाले आहेत.
सुदैवानं या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त समोर आलेलं नाहीये. बस पलटी होऊन हा अपघात झाला. जखमींना स्थानिकांच्या मदतीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. प्रवाशांनी भरलेली बस पलटी झाली. सिए फाटा परिसरात हा अपघात झाला आहे. पहाटे साडेचारच्या दरम्यान हा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. सुदैवानं या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. जखमींना स्थानिकांच्या मदतीनं सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ही बस ठाण्याहून चंदगडला जात होती.
ही बस ठाण्याहून चंदगडकडे निघाली होती. मात्र सिए फाटा परिसरात ही बस पलटी झाली. या भीषण अपघातामध्ये अनेकजण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हा अपघात नेमका कसा झाला याबाबत अद्याप कुठलीही माहिती समोर आलेली नाहीये. मात्र चालकाचं नियंत्रण सुटून हा अपघात झाला असावा असा अंदाज आहे.