वृद्ध आजारी पत्नीची सेवा करून थकलेल्या पतीने तिला (poisoned) विष पाजून व गळा आवळून खून केला. त्यानंतर स्वतःही विष प्राशन केले. कागल तालुक्यात घडलेल्या या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ मारले आहे. पार्वती शंकर पाटील (वय ७८) असे मृत महिलेचे नाव आहे .याप्रकरणी पती शंकर कलगोंडा पाटील (वय ८२) याच्यावर कागल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक शैलजा पाटील यांनी ही फिर्याद दिली आहे.
जयसिंग पार्क कागल येथे शंकर पाटील व त्याची पत्नी पार्वती पाटील हे वृद्ध जोडपे कुटुंबीयांसह राहतात. पार्वती या गेल्या चार ते पाच वर्षांपासून आजारी असल्यामुळे बेडवर झोपूनच असतात ,त्यामुळे त्यांची सेवा पती शंकर पाटील करीत आहेत. शंकर पाटील हे बीपी आणि शुगरचे पेशंट आहेत. त्यामुळे त्यांनाही वयोमानानुसार पत्नीची सेवा करणे जमत नव्हते. पत्नीची सेवा करून आता मी थकलो आहे ,मला जमत नाही असे त्यांनी आपल्या कुटुंबियांना सांगितले होते.
22 नोव्हेंबर रोजी रात्री साडेआठ वाजता शंकर पाटील यांनी पत्नीला पाण्यातून (poisoned) विष पाजले, तिला त्रास होऊ लागल्यामुळे त्यानंतर गळा आवळून पत्नीचा खून केला. हा प्रकार 23 नोव्हेंबर रोजी सकाळी कुटुंबीयांच्या लक्षात आला. पण दरम्यान शंकर पाटील यांनी स्वतःही विष प्राशन केले होते. त्यामुळे ते बेशुद्ध होते. सध्या त्यांच्यावरती कोल्हापूर शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आजारी पत्नीचा खून केल्याबद्दल शंकर कलगोंडा पाटील यांच्यावर कागल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.