Sunday, December 22, 2024
HomeBlogदादा-काकांमधील गोलमाल पुन्हा समोर, अजित पवारांचे पाच मोठे गौप्यस्फोट

दादा-काकांमधील गोलमाल पुन्हा समोर, अजित पवारांचे पाच मोठे गौप्यस्फोट

राष्ट्रवादीत नेमका काय गोलमाल सुरु आहे असं विचारलं जातंय. कारण अजित पवारांनी शरद पवारांबद्दल केलेले हादरवून सोडणारे गौप्यस्फोट. शरद पवारांनी दिलेला राजीनामा ठरवलून दिला होता, त्यानंतर झालेली आंदोलन ठरवून झाली होती, पुण्यात चोरडियांच्या घरी झालेली भेटही ठरवूनच झालेली होती. थोडक्यात शरद पवारांचा अध्यक्षपदाचा राजीनामा ते राष्ट्रवादीतली फूट हे सारं काही पवारांच्या प्लॅनिंगनुसारच झालं असंच दादांना सुचवायचं होतं. शरद पवारांच्या लोक माझे सांगाती पुस्तक प्रकाशन सोहळा 2 मे रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर इथं पार पडलं.

पुस्तक प्रकाशनावेळी शरद पवारांनी अचानक राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरुन पायउतार होण्याची घोषणा केली आणि सभागृहात एकच गोंधळ पाहायला मिळाला. दुपारी 12 वाजता पवारांनी राजीनाम्याची घोषणा केली आणि सभागृहातलं वातावरण एकदम भावनिक झालं.. अजित पवारांसह जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, भुजबळ, दिलीप वळसे पाटील असे राष्ट्रवादीचे पहिल्या फळीतले नेते अक्षरश रडकुंडीला आले होते.. पवारांना राजीनामा मागे घ्या असं सांगत होते.. अजित पवार साऱ्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत होते, अगदी सुप्रिया सुळेंनाही शांत होण्याचा सल्ला त्यांनी भर स्टेजवर दिला होता.. तर बाहेर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते धाय मोकलून रडत होते.. पवारांनी पुन्हा अध्यक्ष व्हावं म्हणून मागणी करत होते..

सारं वातावरण भावनिक झालं होतं.. पण जरा थांबा.. अजित पवारांच्या म्हणण्यानुसार त्यादिवशी वायबीमध्य जे काही घडलं ते सारं स्क्रिप्टेड होतं.. आधीच ठरलेलं होतं.. अगदी पवारांचा राजीनामा आणि त्यानंतर आंदोलनासाठी कार्यकर्ते जमवायचे.. सारं काही आधीच प्लॅन्ड होतं..

 

 


 

 


 

 


 

 


RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -