Sunday, December 22, 2024
Homeक्रीडाटीम इंडियाचा मालिका विजय, ऑस्ट्रेलियावर 20 धावांनी मात

टीम इंडियाचा मालिका विजय, ऑस्ट्रेलियावर 20 धावांनी मात

टीम इंडियाचा मालिका विजय, ऑस्ट्रेलियावर 20 धावांनी मा

टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर चौथ्या टी 20 सामन्यात 20 धावांनी मात केली आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 175 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र टीम इंडियाच्या धारदार बॉलिंगसमोर 7 विकेट्स गमावून कांगारुंना 154 धावाच करता आल्या. टीम इंडियाने या विजयासह मालिकाही जिंकली आहे.टीम इंडिया 5 सामन्यांच्या मालिकेत 3-1 अशा फरकाने आघाडीवर आहे. मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना हा रविवारी 3 डिसेंबर रोजी खेळवण्यात येणार आहे.

ऑस्ट्रेलियाकडून ओपनर ट्रेव्हिस हेड याने सर्वाधिक 31 धावांचं योगदान दिलं. मॅथ्यू शॉर्ट 22 रन्स करुन माघारी परतला. टीम डेव्हिड आणि बेन मॅकडरमॉट या दोघांनी प्रत्येकी 19 धावांचं योगदान दिलं. जोश फिलीपी आणि एरोन हार्डी या दोघांनी प्रत्येकी 8 धावा केल्या. बेन द्वारशुइस 1 रन करुन माघारी परतला. तर कॅप्टन मॅथ्यु वेड याने अखेरपर्यंत झुंज दिली. मात्र त्याला कांगारुंना विजय मिळवून देता आलं नाही. मॅथ्युने सर्वाधिक 36 धावा केल्या. तर ख्रिस ग्रीन 2 धावांवर नाबाद राहिला.

टीम इंडियाच्या गोलंदाजांनी कमाल बॉलिंग केली. गोलंदाजांना 175 धावांचं आव्हान राखता आलं. टीम इंडियाकडून अक्षर पटेल याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. दीपक चाहर याने दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर आवेश खान आणि रवी बिश्नोई या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेत इतरांना चांगली साथ दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -