जर बँकमध्ये सरकारी नोकरी करण्याचे तुमचे स्वप्न असेल तर हे तुमचे स्वप्न नक्कीच साकार होऊ शकते. थेट डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये मोठी बंपर भरती सुरू आहे. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया थेट ज्युनियर असिस्टंट मॅनेजर या पदासाठी होतंय.तब्बल 800 जागा आणि रिक्त 1300 जागांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. मग अजिबात उशीर न करता आजच अर्ज करा आणि थेट मिळवा सरकारी नोकरी. विशेष म्हणजे बँक ऑफ इंडियामध्ये तुम्हाला ज्युनियर असिस्टंट मॅनेजर या पदावर काम करण्याची ही संधीच आहे. जाणून घ्या या भरती प्रक्रियेसंदर्भातील सविस्तर माहिती.
या भरती प्रक्रियेची शेवटची तारीख ही 6 डिसेंबर 2023 आहे. यामुळे उशीर न करता लगेचच अर्ज करा. अर्ज करण्यासाठी अवघे आता चार दिवसच शिल्लक राहिले आहेत. यामुळेच उमेदवारांनी शक्य तेवढ्या लवकरच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. ही खरोखरच बँक ऑफ इंडियामध्ये मोठा बंपर भरती म्हणावी लागणार आहे.
विशेष म्हणजे भारताच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात राहून तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकता. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची पद्धत अत्यंत सोपी आहे. चला तर मग करा फटाफट अर्ज आणि मिळता थेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी. ही भरती प्रक्रिया 22 नोव्हेंबर 2023 पासून सुरू आहे. भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी http://idbibank.in या वेबसाईटला जा आणि अर्ज भरा. इथे तुम्हाला या भरती प्रक्रियेसंदर्भातील सर्व माहिती मिळेल. या भरती प्रक्रियेचा अर्ज करताना तुम्हाला फिस भरणे देखील आवश्यक आहे. 1000 रूपये फिस भरावी लागणार आहे. एसटीच्या उमेदवारांसाठी 200 रूपये फिस या भरती प्रक्रियेसाठी असणार आहे.
ज्युनियर असिस्टंट मॅनेजर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे. या भरती प्रक्रियेसाठी वयाची मोठी अट असणार आहे. उमेदवाराचे वय 20 पेक्षा जास्त आणि 25 पेक्षा कमी असणे आवश्यक आहे. यामध्ये फक्त आरक्षणामध्ये येणाऱ्या उमेदवारांना खास सवलत देण्यात आलीये.
आता उशीर न करता थेट या भरती प्रक्रियेसाठी आपला अर्ज करा. या भरती प्रक्रियेसंर्दभातील प्रत्येक अपडेट तुम्हाला साईटवर मिळेल. या भरती प्रक्रियेसाठी परीक्षा असल्याचे देखील सांगितले जातंय. हे लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटीची तारीख ही 6 डिसेंबर 2023 ही आहे.