Monday, December 23, 2024
Homeराजकीय घडामोडीलोकसभा निवडणुकीपूर्वी पुण्यात ठाकरे गटाचे शक्तीप्रदर्शन, मोठी पोस्टरबाजी करत…

लोकसभा निवडणुकीपूर्वी पुण्यात ठाकरे गटाचे शक्तीप्रदर्शन, मोठी पोस्टरबाजी करत…

 

 

 

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा मेळावा पुण्यात होत आहे. मेळाव्याच्या माध्यमातून ठाकरे गट पुणे शहरात शक्ती प्रदर्शन करणार आहे. मेळाव्यासाठी ठाकरे गटाकडून ठाकरे गटाची मोठी पोस्टरबाजी करण्यात आली आहे.महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे. यासाठी ठिकठिकाणी मेळावे घेऊन शक्तीप्रदर्शन केले जात आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आपला मोर्चा शरद पवार यांचे गड असलेल्या पुणे जिल्ह्याकडे वळवला आहे. शनिवारी शिवसेनेचा जाहीर मेळावा पुण्यात होत आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून ठाकरे गट पुण्यात शक्ती प्रदर्शन करणार आहे. मेळाव्यासाठी ठाकरे गटाकडून ठाकरे गटाची मोठी पोस्टरबाजी करण्यात आली आहे.

पुणे लोकसभेवर काँग्रेसकडून यापूर्वीच दावा करण्यात आला आहे. शरद पवार गटही आपला दावा सोडणार नाही. यामुळे आता उद्धव ठाकरे यांची शिवसेनाही पुणे लोकसभेच्या तयारीला लागली की काय? अशी चर्चा सुरु झाली आहेपुण्यात ९ डिसेंबर रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा जाहीर मेळावा होत आहे. ठाकरे गटाच्या मेळाव्याला खासदार संजय राऊत संबोधित करणार आहेत. ठाकरे गटाकडून पुण्यात मेळाव्याची जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. मेळाव्याच्या ठिकाणी ठाकरे गटाची मोठी पोस्टरबाजी केली गेली आहे.

मेळाव्याच्यापुण्यातील मेळाव्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांची जाहीर सभा संध्याकाळी होणार आहे. पुणे येथील आंबेडकर कॉलेजच्या मैदानावर ठाकरे गटाची सभा होणार आहे. या सभेसाठी जिल्ह्याभरातून शिवसैनिक येणार आहे. पुण्यातून संजय राऊत सरकारवर निशाणा साधणार आहे. यावेळी अजित पवार यांच्यासंदर्भात राऊत काय बोलणार? याकडे लक्ष लागले आहे. अजित पवार आणि शरद पवार याच्या गडात ही सभा होत असल्यामुळे राजकीय निरीक्षकांचे लक्षही संजय राऊत यांच्या भाषणाकडे लागले आहे. माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असलेल्या शरद पवार यांच्या गडात ठाकरे गटही शक्ती प्रदर्शन करणार आहे. मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -