Monday, December 23, 2024
Homeब्रेकिंगरवीना टंडनने उडवली बिग बींच्या नातूच्या अभिनयकौशल्याची खिल्ली; व्हायरल मीमवर दिली अशी...

रवीना टंडनने उडवली बिग बींच्या नातूच्या अभिनयकौशल्याची खिल्ली; व्हायरल मीमवर दिली अशी प्रतिक्रिया

झोया खान दिग्दर्शित ‘द आर्चीज’ या चित्रपटातून शाहरुख खानची मुलगी सुहाना खान आणि बोनी कपूर-श्रीदेवी यांची मुलगी खुशी कपूर यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या दोघींसोबतच अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा यानेसुद्धा सिनेसृष्टीत पहिलं पाऊल टाकलं. हा चित्रपट 7 डिसेंबर रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. काहींना हा चित्रपट आवडला तर काही जणांनी सुहाना, खुशी आणि अगस्त्य या स्टारकिड्सच्या अभिनयाची खिल्ली उडवली.

या चित्रपटातील काही सीन्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यावरून नेटकऱ्यांनी काही हास्यास्पद मीम्ससुद्धा तयार केले आहेत. असाच एक मीम अभिनेत्री रवीना टंडनने लाइक केला आहे. या मीममध्ये अगस्त्य नंदा आणि खुशी कपूर यांच्या अभिनयाची खिल्ली उडवण्यात आली होती. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत झोया अख्तर घराणेशाहीच्या टीकेवर मोकळेपणे व्यक्त झाली. “घराणेशाही तेव्हा होते जेव्हा मी लोकांचा पैसा किंवा कोणा दुसऱ्यांचा पैसा घेते आणि तो मी माझ्या मित्रांवर, कुटुंबीयांवर खर्च करते. जर मी माझा पैसा स्वत:च खर्च करतेय, तर त्याला घराणेशाही नाही म्हणू शकत. मी माझ्या पैशांचं काय केलं पाहिजे, हे सांगणारे तुम्ही कोण? हा माझा पैसा आहे. जर उद्या मी माझा पैसा माझ्या भाचीवर खर्च करु इच्छिते तर ही माझी समस्या आहे”, अशा शब्दांत तिने सुनावलं होतं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -