श्रीलंका देश आधीच आर्थिक संकटांचा सामना करत आहे. अशातच श्रीलंकेवर आता आणखी एक संकट आलं आहे. हे संकच आहे विजेचं… श्रीलंकेतील लाईट गेली आहे. हे लाईट जाण्याचं कारण काय आहे? आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या श्रीलंकेतील आता बत्तीही गुल झाली आहे.
श्रीलंका या देशातील बत्तीगुल आहे. संपूर्ण देशातील लाईट गेल्याने सगळीकडे अस्वस्थता पसरली आहे. मागच्या कित्येक तासांपासून श्रीलंकेत लाईट नाहीये…
श्रीलंकेतील सिस्टीममध्ये बिघाड झाल्याने श्रीलंकेतील बत्तीगुल आहे. 2022 पासून श्रीलंका आर्थिक संकटाचा सामना करत आहे. अशातच आता देशातील लाईटही गेली आहे.
कोटमाले-बियागामा दरम्यान ट्रान्समिशन लाइन तुटली आहे. यामुळे संपूर्ण श्रीलंकेतील बत्ती गुल आहे. यामुळे नागरिकांना मात्र त्रास सहन करावा लागत आहे.
सिलोन इलेक्ट्रिसिटी बोर्ड (सीईबी) ही कंपनी श्रीलंकेत वीज पुरवठा करते. मात्र सध्या यंत्रणेत बिघाड झाल्याने श्रीलंकेतील लाईट गेली आहे.
लाईट नसल्याने श्रीलंकेत इंटरनेट सुविधा देखील बंद आहे. त्याचा लोकांच्या सर्वच कामांवर परिणाम झाला आहे. दरम्यान, मेडिकल कॉलेज आणि दवाखान्यांमध्ये मात्र आपत्कालीन इनव्हर्टरवर काम केलं जात आहे.