Sunday, December 22, 2024
Homeकोल्हापूरमोटरसायकलवरून घसरुन जखमी झालेल्या तरुणाचे निधन

मोटरसायकलवरून घसरुन जखमी झालेल्या तरुणाचे निधन

सांगरुळ – खाटांगळे दरम्यान मोटरसायकल घसरून झालेल्या अपघातात आमशी (ता. करवीर) येथील युवक जखमी झाला होता. गेली चार दिवस उपचार सुरू असताना त्याचे निधन झाले. सचिन बाळू पाटील (वय ३८) असे मृत तरुणाचे नाव असून या घटनेची नोंद करवीर पोलीस ठाण्यात झाली आहे. सचिन पाटील सेंट्रींग मिस्त्री म्हणून काम करत होता. बुधवार दि. ६ रोजी काम संपवून घरी आल्यानंतर तो घरगुती कामानिमित्त सांगरूळ येथे चालला होता.

सांगरूळ ते खाटांगळे दरम्यान असणाऱ्या वळणावर त्याची मोटरसायकल घसरून तो जखमी झाला होता. उपचारासाठी त्याला सीपीआर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. रविवार दि. १० रोजी उपचारास साथ न दिल्याने त्याची प्राणज्योत मालवली. त्याच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी व भाऊ असा परिवार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -