हँटसेट निर्माता कंपनी Lava ने भारतीय बाजारात दमदार बजेट स्मार्टफोन उतरवला आहे. ग्राहकांसाठी हा एक नवीन स्मार्टफोन दाखल झाला आहे. कंपनीने Lava Yuva 3 Pro लाँच केला आहे. हा स्मार्टफोन ग्राहकांसाठी तीन रंगात उपलब्ध करुन देण्यात आला आहे. कंपनीने हा स्मार्टफोन AG ग्लास बॅक पॅनलसह आणला आहे. त्यामुळे तो लक्षवेधी ठरला आहे. 10 हजार रुपयांपर्यंत बजेट असणाऱ्यांसाठी हा स्मार्टफोन खास आहे. यामध्ये तुम्हाला 8 जीबी ऐवजी 16 जीबीपर्यंत रॅम मिळते. तर ग्राहकांना यामध्ये 50MP कॅमेरा देण्यात आला आहे
असे आहे फीचर
या स्मार्टफोनमध्ये 50 मेगापिक्सल कॅमेरा सेन्सर, दमदार बॅटरी आणि फास्ट चार्ज सपोर्टसारख्या अनेक सुविधा मिळतात. या Lava Yuva 3 Pro फोनमध्ये ग्राहकांना इतर पण अनेक सुविधा मिळतात. हा तरुणांनासाठी एकदम बजेट फोन आहे. याचा 6.5 इंचचा एचडी प्लस डिस्प्ले या फोनला खास लूक देतो.काय आहे किंमत
या स्वस्त बजेट स्मार्टफोनच्या 8 जीबी रॅम/128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 8 हजार 999 रुपये आहे. हा डिव्हाईस ग्राहकांसाठी डेसर्ट गोल्ड, फॉरेस्ट Viridian आणि मीडो पर्पल रंगात उपलब्ध आहे. हा हँडसेट लावा रिटेल नेटवर्क आणि लावाच्या अधिकृत साईटवर खरेदी करता येतो.
Lava Yuva 3 Pro Specifications
90 हर्ट्ज रिफ्रेश रेट सपोर्टसह हा मोबाईल 6.5 इंच एचडी प्लस डिस्प्ले मिळतो. स्पीड आणि मल्टिटास्किंगसाठी लावा कंपनीच्या या लेटेस्ट फोनमध्ये युनिसॉक टी616 ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 8 जीबी रॅम देण्यात आली आहे. तुम्ही व्हर्च्युअल रॅमच्या मदतीने याचे रॅम 16 जीबीपर्यंत सहज वाढवू शकता. या मोबाईलच्या मागील भागात 50 मेगापिक्सल डुअल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तर या स्मार्टफोनच्या समोरील बाजूस 8 मेगापिक्सल कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. फोटो, व्हिडिओ आणि इतर फाईल स्टोअरेजसाठी हँडसेटमध्ये 128 जीबी यूएफएस 2.2 स्टोरेज देण्यात आले आहे. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने 512 जीबी पर्यंत वाढविण्यात येते.
कनेक्टिव्हिटीसाठी 4G VoLTE, वाय-फाय, ब्लूटूथ व्हर्जन 5, युएसबी टाइप-सी पोर्ट आणि 3.5 मिलीमीटर ऑडियो जॅक देण्यात आले आहे. या फोनच्या सुरक्षेसाठी पॉवर बटनमध्येच फिंगरप्रिंट सेन्सर इंटिग्रेट करण्यात आले आहे. यामध्ये 5000 एमएएचची बॅटरीची क्षमता आहे. 18 वॅट फास्ट चार्ज पोर्ट त्यासाठी उपलब्ध आहे.