Tuesday, December 24, 2024
Homeकोल्हापूरगांधीनगर पोलीस विशेष पुरस्काराने सन्मानित

गांधीनगर पोलीस विशेष पुरस्काराने सन्मानित

गांधीनगर पोलीसना  विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  करवीर तालुक्यातील गांधीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील व डी बी पथकाचे पोलीस हेड कॉ.बजरंग हेब्बाळकर, संदिप कुंभार, सचिन सावंत, संतोष कांबळे,रोहन चौगले या सर्वांचा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या हस्ते अधिक्षक कार्यालयात विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

गांधीनगर पोलीस ठाण्याचे सा. पो. नि. अर्जुन घोडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गांधीनगर गुन्हे शोध पथकाने माहे नोव्हेंबर महिन्यात तब्बल ६ गुन्हे उघडकीस आणून १० आरोपींन अटक करुन त्यांच्या ताब्यातील ७१,८०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.या कामगिरी बद्दल सपोनि अर्जुन घोडे पाटील व गांधीनगर डी.बी. पथकाचे पोलीस अधीक्षक महेन्द्र पंडीत यांच्या हस्ते विशेष पुरस्काराने देऊन गौरविण्यात आले.

यावेळी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई व पोलीस दलातील अधिकारी उपस्थित होते.गांधीनगर पोलिसांचे या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -