टीम इंडिया साऊथ आफ्रिका दौऱ्यावर असून टी-20 मालिका संपली आहे. तीन सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत सुटली आहे. त्यानंतर 17 डिसेंबर म्हणजेच उद्यापासून वन डे मालिकेला सुरूवात होणार आहे. या मालिकेला सुरूवात होण्याआधी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचे एक नाहीतर दोन बॉलर हे बाहेर झालेत. याबाबत बीसीसीयआयने अधिकृत घोषणा केलीये. मालिकेला सुरूवात होण्याआधीच टीममधील हुकमी एक्का असलेले बॉलर बाहेर झाल्यामुळे संघासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
कोण आहेत ते दोन बॉलर?
साऊथ आफ्रिकेविरूद्धच्या कसोटी मालिकेआधी संघाचा हुकमी एक्क असलेला मोहम्मद शमी याला वगळण्यात आलं आहे. कसोटी संघ जाहीर झाला तेव्हा शमीच्या फिटनेसवर त्याचा सहभाग अवलंबून असल्याचं सांगितलं होतं. शमीच्या फिटनेसबाबत बीसीसीआयकडून कोणतीही माहिती देण्यात आली नाही. शमीच्या जागी बदली खेळाडू म्हणून कोणाची निवड करण्यात आलीय याबाबत बीसीसीआयने कोणत्याही खेळाडूच्या नावाची घोषणा केली नाही.
रविवारपासून सुरू होणाऱ्या वन मालिकेमध्ये दीपक चहर याने आपलं नाव मागे घेतलं आहे. कुटंबातील खासगी कारणामुळे त्याने आपलं नाव मागे घेतल्याची माहिती सजमत आहे. दीपक चहरच्या जागी संघात आकाश दीप याचा समावेश केला आहे. त्यासोबतच श्रेयस अय्यर शेवटच्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये खेळणार नसल्याचं बीसीसीआने सांगितलं आहे. पहिल्या कसोटीनंत श्रेयस कसोटी संघात सामील होणार आहे.
दोन कसोटी सामन्यांसाठी भारताचा संघ: रोहित शर्मा (C), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रुतुराज गायकवाड, इशान किशन (WK), केएल राहुल (WK), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद. सिराज, मुकेश कुमार, मोहम्मद. शमी*, जसप्रीत बुमराह (VC), प्रसीध कृष्णा.
तीन वनडेसाठी भारताचा संघ: रुतुराज गायकवाड, साई सुदर्शन, तिलक वर्मा, रजत पाटीदार, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, केएल राहुल (C&W), संजू सॅमसन (WK), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल , मुकेश कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंग, दीपक चहर.