Monday, December 23, 2024
HomeनोकरीJio ची नोकरीची ऑफर, नवीन उमेदवारांना पण दमदार पगार, आताच असा अर्ज...

Jio ची नोकरीची ऑफर, नवीन उमेदवारांना पण दमदार पगार, आताच असा अर्ज करा

Jio Job | तु्म्ही ऑनलाईन फ्रीलान्स नोकरीची संधी शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या जिओ कंपनीत तरुणांना फ्रीलान्स जॉबची संधी उपलब्ध झाली आहे. या नोकरीसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. नवीन उमेदवारांना 50 हजार रुपयांपर्यंत पगाराची संधी देण्यात येत आहे.

अनेक तरुण नोकरीच्या शोधात आहेत. त्यांच्यासाठी आनंदवार्ता आहे. तरुणांना आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या जिओमध्ये करिअरची (Jio Career) संधी मिळत आहे. जिओने तरुणांसाठी फ्रीलान्स वर्कची संधी उपलब्ध करुन दिली आहे. विशेष या पदासाठी नवशिके, नवीन उमेदवारांना पण संधी आहे. ते पण या पदासाठी अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी त्यांना 50 हजार रुपयांपर्यंत पगार मिळू शकतो. त्यासाठी मोठे दिव्य करण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या ऑनलाईन अर्ज करु शकता. तो कसा करायचा, काय कागदपत्रे द्यायची यासंबंधीची माहिती जाणून घ्या…

जिओसोबत फ्रीलान्स करिअर

 

Jio Career वर फ्रीलान्सर जॉबसाठी अर्ज करण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा

 

सर्वात अगोदर Jio Career चे संकेतस्थळ https://careers.jio.com/ वर जा

 

 

यानंतर फ्रीलान्सर हा पर्याय निवडा. त्यावर क्लिक करा. याठिकाणी अनेक जॉबचे पर्याय मिळतील

 

 

तुमच्या आवडीचा नोकरी निवडा

 

 

त्यानंतर नोकरीची सविस्तर माहिती घेण्यासाठी त्यावर क्लिक करा

 

 

नोकरीसाठी अर्ज करा, या पर्यायावर क्लिक करा

 

 

तुमचा रिझ्युम आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा

 

 

या एक चांगला पर्याय आहे. यामध्ये तुमच्या गुणवत्ता आणि शैक्षणिक पात्रतेनुसार तुम्ही नोकरी शोधू शकता. तुम्ही 10 वी पास असाल अथवा पदवीधर असाल तुमच्यासाठी नोकरी उपलब्ध आहे. तुमचा अर्ज Jio Career टीम द्वारा तपासण्यात येईल. तुमचा अर्ज मंजूर झाला तर एक ईमेल येईल. त्यानंतर पुढील प्रक्रियेची माहिती देण्यात येईल.

 

या गोष्टी ठेवा लक्षात

 

Jio Career मध्ये फ्रीलान्सर जॉबसाठी अर्ज करण्याची ही संधी आहे

 

तुमचा रिझ्यूम अपडेट ठेवा. त्यातील वाक्यरचनेतील चूका सुधारा

 

 

कागदपत्रे अपलोड करताना त्यावर डाग असू नयेत

 

 

तुमचा अर्ज पॉवर पाईंट्सच्या मदतीने हायलाईट करा

 

 

तुम्ही योग्य उमेदवार असल्याचे या रिझ्यूममधून ठासले जावे

 

 

तुमच्या कामावर पगार अवलंबून आहे

 

 

जितक्या दिवस काम कराल. तितका पगार जमा होईल

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -