Saturday, November 23, 2024
Homeब्रेकिंगलग्नानंतर होत नव्हतं मूल, कोरोनामध्ये पतीही गेला, अन् आता झाली आई….

लग्नानंतर होत नव्हतं मूल, कोरोनामध्ये पतीही गेला, अन् आता झाली आई….

ताजी बातमी ऑनलाईन टीम 

Crime News : कोरोना महामारीमध्ये अनेक जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. कुटूंबच्या कुटूंब महामारीमध्ये संपलीत. काहींना तर मृत्यू झालेल्या आपल्या माणसांची राखही मिळाली नाही. अशातच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोरानामध्ये दोन वर्षापूर्वी पतीच्या झालेल्या मृत्यूनंतर महिला आता गरोदर राहिल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. नेमकं काय प्रकरण जाणून घ्या.

काय आहे प्रकरण?

संगीता असं गरोदर राहिलेल्या महिलेचं नाव होतं. तिचं अरूण प्रसाद या व्यक्तीसोबत लग्न झालं होतं. उशिरा लग्न झाल्यामुळे त्यांना मूल राहत नव्हतं. या काळात त्यांनी अनेक उपचार घेतले मात्र संगीता गरोदर राहिल्या नाहीत. कोरोनामध्ये अरूण यांचं निधन झाल्याने ती खचून गेली. मात्र संगीता यांची आई होण्याची इच्छा अपूर्ण राहिली होती. पश्चिम बंगालमधील उत्तर २४ परगणा येथील नैहाटीमध्ये संगीता राहत आहेत.

आई होण्याची इच्छा असलेल्या संगीताने तिची इच्छा डॉक्टरांना सांगितली. संगीताच्या आई होण्याच्या निर्णयाला सासरचे किंवा सासरच्या मंडळींनी सहमती दर्शवली नाही. पतीच्या निधनानंतर संगीता आई-वडील आणि सासरच्यांसोबत राहत नाही. घरच्यांच्या पाठिंब्याशिवाय संगीताने आई होण्याची इच्छा कधीच मरू दिली नाही. संगीताने पश्चिम बंगालमधील रामपूरहाट मेडिकल कॉलेजमधील डॉक्टरांशी संपर्क साधला. डॉक्टरांनी इन विट्रो फर्टिलायझेशन (IVF) चा वापर केला आणि संगीता यांनी बाळाला जन्म दिला.

दरम्यान, संगीता यांनी मृत्यूपूर्वी तिच्या पतीचे शुक्राणू कोलकाता येथील प्रयोगशाळेत ठेवले होते. नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करत संगीता आई बनली. संगीता यांचं आता वय 48 वर्षे इतकं आहे. पती कोरोनामध्ये गेल्यावरही बाळाला जन्म दिल्याने सर्वत्र चर्चा होत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -