भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये टेस्ट सीरीज येत्या 26 डिसेंबरपासून सुरु होणार आहे. जोहान्सबर्गमध्ये पहिला कसोटी सामना होईल. मात्र, त्याआधी विराट कोहलीबद्दल एक मोठी बातमी आहे. विराट कोहली दक्षिण आफ्रिकेतून अचानक माघारी परतला आहे. काही कौटुंबिक इमर्जन्सीमुळे विराट भारतात परतल्याच बोलल जातय. अजूनपर्यंत कुठलीही ठोस माहिती मिळालेली नाही. अचानक विराट मुंबईत का निघून आला?. विराट कोहली 3 दिवसांपूर्वी मुंबईत आलाय. टीम इंडियाच्या इंट्रा-स्क्वाडमध्ये सुद्धा तो सहभागी होऊ शकला नाही.
बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितलं की, विराट कोहलीच्या बाबतीत घाबरण्याची आवश्यकता नाहीय. रिपोर्ट्सनुसार विराट कोहली दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट सीरीजमधून बाहेर गेलेला नाही. तो दोन्ही सामने खेळणार आहे. विराट कोहली शुक्रवारी दक्षिण आफ्रिकेत पोहोचेल अशी माहिती आहे. फॅमिली इमर्जन्सीमुळे विराट कोहलीच्या तयारीवर परिणाम झालाय.
दक्षिण आफ्रिकेत विराटचा रेकॉर्ड कसा आहे?
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट सीरीजमध्ये विराट कोहलीची महत्त्वाची भूमिका असेल. दक्षिण आफ्रिकेत कॅप्टन रोहित शर्माचा रेकॉर्ड खूप खराब आहे. त्यामुळे विराटवर जास्त जबाबदारी असेल. विराटने दक्षिण आफ्रिकेत 51 पेक्षा जास्त सरासरीने 719 धावा केल्यात. यात दोन शतक आहेत. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेत एकही टेस्ट सीरीज जिंकलेली नाही. विराटची बॅट चालली, गोलंदाजाची साथ मिळाली, तर यावेळी टीम इंडियाने टेस्ट सीरीज जिंकू शकते.
ऋतुराज गायकवाडच्या जागी कोणाला संधी?
विराट कोहली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टेस्ट सीरीजमध्ये खेळू शकतो. पण टीम इंडियाचा एक ओपनर सीरीजमधून बाहेर गेलाय. ऋतुराज गायकवाडच्या बोटाला दुखापत झालीय. त्यामुळे तो टेस्ट सीरीजमधून बाहेर गेलाय. गायकवाडला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या वनडे सामन्यात दुखापत झाली होती. त्यामुळे तो तिसऱ्या वनडेमध्ये खेळू शकला नाही. ऋतुराजच्या जागी टेस्ट टीममध्ये कोणाला संधी मिळणार? ते अजून स्पष्ट झालेल नाहीय. रिपोर्ट्सनुसार सर्फराज खान आणि अभिमन्यु ईश्वरन दोघांपैकी एकाला संधी मिळू शकते.