आयपीएल 2024 स्पर्धेपूर्वी मुंबई इंडियन्ससाठी वाईट बातमी समोर आली आहे. स्पर्धेपूर्वी कर्णधारपदाची माळ हार्दिक पांड्याच्या गळ्यात टाकणं आता महागात पडलं आहे. मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सकडून हार्दिक पांड्याला ट्रेड केलं होतं. तसेच रोहित शर्माला दूर करत हार्दिक पांड्याकडे नेतृत्व सोपवलं होतं. यामुळे क्रीडाविश्वात मोठी खळबळ उडाली होती. मात्र आता व्यवस्थापनाचा हा डाव त्यांच्यावरच उलटल्याचं दिसत आहे. कारण हार्दिक पांड्याचं आयपीएल 2024 स्पर्धेत खेळणं कठीण आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान जखमी झालेल्या हार्दिक पांड्याबाबत कोणतीही अपडेट समोर आलेली नाही.बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात जखमी झाल्यानंतर हार्दिक पांड्या जखमी झाल्यानंतर पुन्हा मैदानात परतलाच नाही. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेतही खेळला नाही. त्यामुळे आयपीएल 2024 स्पर्धेत खेळण्याबाबत संभ्रम आहे. त्यामुळे जर हार्दिक पांड्या आयपीएल 2024 खेळू शकला नाही, तर कर्णधारपदाची धुरा कोणाच्या खांद्यावर असेल? याबाबत आता खलबतं सुरु झाली आहे.हार्दिक पांड्या अफगाणिस्तान विरुद्धच्या टी20 मालिकेतही खेळणार नसल्याची सूत्रांची माहिती आहे. यापूर्वी तो या मालिकेपूर्वी फिट अँड फाईन होईल अशी आशा होती. पण पीटीआयशी बोलताना बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, त्याच्या फिटनेसबाबत अजूनतरी काही अपडेट आलेलं नाही. त्यामुळे तो कधी फिट होईल हे काही सांगता येत नाही. त्यामुळे आयपीएल 2024 स्पर्धेत खेळण्याबाबतही साशंकता आहे.
आता प्रश्न असा आहे की, हार्दिक पांड्या जर रिकव्हर झाला नाही तर त्याच्या गैरहजेरीत कर्णधारपद कोण भूषवेल? रोहित शर्माला कर्णधारपदावरून दूर केल्याने त्याच्याकडे जबाबदारी देणं कठीण आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सकडे आता सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह हे दोन पर्याय उरतात. या दोघांपैकी एकाची निवड या पर्वात होऊ शकते. सूर्यकुमार यादवकडेच धुरा जाण्याची जास्त शक्यता आहे.आयपीएल 2024 स्पर्धेसाठी मुंबई इंडियन्सचा संघ : इशान किशन (विकेटकीपर), विष्णु विनोद (विकेटकीपर), रोहित शर्मा, टिम डेविड, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, डेवॉल्ड ब्रेविस, हार्दिक पांड्या, रोमारियो शेफर्ड, नेहल वढेरा, शम्स मुलानी, गेराल्ड कोएत्झी, मोहम्मद नबी, शिवालिक शर्मा, नमन धीर, जसप्रीत बुमराह, जेसन बेहरेनडोर्फ, कुमार कार्तिकेय, आकाश मढवाल, अर्जुन तेंडुलकर, पियुष चावला, दिलशान मदुशंका, नुवान तुषारा, अंशुल कंबोज, श्रेयस गोपाळ.