Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंगएसटी महामंडळात मेगा भरती, दहावी पास असाल तर लगेच करा अर्ज

एसटी महामंडळात मेगा भरती, दहावी पास असाल तर लगेच करा अर्ज

 

सध्याच्या काळात अनेक तरुण सरकारी नोकरीच्या शोधात आहेत. अशा तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. आपण जर दहावी पास असला तर लवकरात लवकर भरतीच्या तयारीला लागा. कारण महाराष्ट्र राज्य एस.टी.महामंडळाकडून मेगा भरती प्रक्रिया राबविली जात आहे. शिकाऊ उमेदवारांसाठी ही भरती प्रक्रिया राबविली जातेय. याबाबत महामंडळाकडून नुकतेच एक अधिसूचना काढण्यात आली आहे.

 

नोकरीची मोठी संधी

 

एसटी महामंडळाकडून राज्यात महाभरती करण्यात येत आहे. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत आहेत. केवळ दहावी पासच नाही तर आयटीआयमधील तरुणांनाही नोकरीची संधी आहे. नोकरीचे ठिकाण हे सातारा असणार आहे. त्यामुळे याबाबत इच्छुकांनी त्वरीत निर्णय घेण्याची गरज आहे.

 

किती आहेत पदे?

 

एस.टी. महामंडळात होणारी ही भरती प्रक्रिया 145 पदांसाठी आहे. चांगल्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे. विशेष म्हणजे ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने ही भरती प्रक्रिया होत आहे. 13 जानेवारी 2024 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. त्यामुळे इच्छुकांनीत्यापूर्वीच अर्ज करावेत. भरती प्रक्रियेसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करत असाल तर विभाग नियंत्रक कार्यालय, एस. टी. स्टॅण्ड जवळ , सातारा येथे तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे.

 

या पदांसाठी आहेत जागा

 

मोटार मेकॅनिक वाहन एकून जागा 40, मेकॅनिक डिझेल एकून जागा 34, ऑटो इलेक्ट्रिशियन एकूण जागा 30, प्रशितन व वातानुकुलिकरण एकूण जागा 6, मोटार वाहन शीट मेटल वर्कर एकूण जागा 30, टर्नर एकूण जागा 3, वेल्डर एकूण जागा 2 याप्रमाणे ही भरती प्रक्रिया पार पडत आहे.

 

राज्यात नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही संधी आहे. त्यामुळे अजिबातच उशीर न करता या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांनी लगेचच अर्ज करावेत. महाराष्ट्र राज्य एस. टी. महामंडळाकडून ही भरती प्रक्रिया राबवली जात असून या भरती प्रक्रियेबद्दलचे अधिक अपडेट वेबसाईटवर बघायला मिळतील.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -