Sunday, December 22, 2024
Homeराजकीय घडामोडीआता वडिलांच्या नावाआधी आईचं नाव; अजित पवारांनी दिली महत्वाची माहिती

आता वडिलांच्या नावाआधी आईचं नाव; अजित पवारांनी दिली महत्वाची माहिती

 

 

अदिती तटकरे यांनी चौथं महिला धोरण आणलं. महिला मंत्री असल्यामुळे त्यातील बारकावे त्यांना माहित होते. त्यातील काही माहिती अजित पवार यांनी दिली. यापुढे अजित अनंतराव पवार असं नाव दिलं जायचं मुल जन्माला आल्यानंतर मुलाचं नाव, वडिलांच नाव आणि आडनाव असं असायचं पण आता आपण नविन निर्णय घेतला आहे.

 

इथून पुढे मुलगा असो की मुलगी आधी मुलाचे नाव नंतर आईचं नाव, नंतर वडिलांच आणि पुढे आडनाव अस असणार आहे. कारण शेवटी महिला देखील समाजातील महत्वाचा घटक आहेत, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

 

मी तर अर्थमंत्री या नात्याने सांगतो जर तुम्हाला एखादा फ्लॅट घ्यायचा असेल तर पुरुषाला ६ टक्के कर मात्र महिलेच्या नावावर घेतला तर १ टक्का सवलत आहे. ५० लाखाचं घर असलं तर ५० हजार रुपये वाचतात. यापुढे महिलांनी नवरोबाला सांगावं घर घ्यायचं असेल तर माझ्या नावावर घे, पैसे वाचतील, असे अजित पवार म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -