आता वर्षाचा शेवटचा महिना संपायला अवघे काही दिवस उरले असून त्यानंतर नवीन वर्षाची(banks near me) सुरुवात होणार आहे. नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी भारतीय रिझर्व्ह बँकेने बँकांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. बँक हा प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे, पैशाचे व्यवहार, धनादेश आणि इतर अनेक कामांसाठी बँकेत जावे लागते. तुम्हालाही नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी बँकेत जायचे असेल तर जानेवारी महिन्यातील सुट्ट्यांची यादी.
जानेवारी महिन्यात १६ दिवस बँका (banks near me)बंद राहाणार आहे. १६ दिवसांच्या बँक सुट्टयांमध्ये सर्व रविवार, दुसरा आणि चौथा शनिवार यांचा समावेश असणार आहे. आजकाल सर्व डिजिटल झाल्यामुळे बँकाची कामेही ऑनलाईन होतात. परंतु काही कामांसाठी बँकेत जाणे आवश्यक असते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जानेवारी महिन्यातील सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे.नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात मकर संक्रांती, प्रजासत्ताक दिन आणि अनेक सरकारी सुट्टया असल्याने बँका बंद राहाणार आहेत. मोबाईल बँकिंग, UPI आणि इंटरनेट बँकिंगद्वारे तुम्ही तुमचे काम पूर्ण करु शकता. डिसेंबर महिना संपायला अवघे काही दिवस राहिले असून जानेवारी महिन्यात बँकांच्या सुट्टयांची यादी जाहिर केली आहे.१ जानेवारी- नववर्षाभिनंदन
७ जानेवारी – रविवार
११ जानेवारी – मिशनरी डे (मिझारोम)
१२ जानेवारी – स्वामी विवेकानंद जयंती (पश्चिम बंगाल)
१३ जानेवारी – दुसरा शनिवार
१४ जानेवारी – रविवार
१५ जानेवारी – पोंगल/ थिरुवल्लुवर (तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश)
१६ जानेवारी – तुसू पूजा (पश्चिम बंगाल आणि आसाम)
१७ जानेवारी – गुरु गोविंद सिंह जयंती
२१ जानेवारी – रविवार
२३ जानेवारी – नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती
२५ जानेवारी – राज्य दिन (हिमाचल प्रदेश)
२६ जानेवारी – प्रजासत्ताक दिन
२७ जानेवारी – चौथा शनिवार
२८ जानेवारी – रविवार
३१ जानेवारी – मी-दाम-मी-फी (आसाम)
बँकेत जर काही काम असेल तर या सुट्ट्या नक्की बघून जा. या सुट्ट्यांबरोबरच वेगवेगळ्या राज्यात त्यांच्या सणानुसार त्यांना प्रादेशिक सुट्ट्या असणार आहेत.